Fan Enter In Dressing Room To Meet Babar Azam: प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं स्वप्न असतं की त्यांनी एकदा तरी आपल्या आवडत्या खेळाडूला भेटावं. पण हे सहज शक्य होत नाही. कारण मैदानात आणि मैदानाबाहेर असतानाही खेळाडूंच्या आसपास सुरक्षारक्षक असतात. पण लाईव्ह सामन्यादरम्यान क्रिकेट चाहते मैदानात घुसखोरी करून खेळाडूंची भेट घेतात. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होते. पण खेळाडूंना भेटण्याचं स्वप्न मात्र पूर्ण होतं. पण पाकिस्तानात भलताच प्रकार घडला आहे. सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्याने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून थेट पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये एंट्री केली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमचा १५ ऑक्टोबरला वाढदिवस होता. त्यावेळी तो पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळण्यात व्यस्त होता. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजयी सुरूवात केली. पण या सामन्यानंतर घडलेल्या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममधला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक क्रिकेट चाहता गॅलरीला लटकून पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करतो. तो बाबर आझमला भेटण्यासाठी आलेला असतो. पण संघातील सहखेळाडू त्याला माघारी जाण्यासाठी सांगतात. पण तो पु्न्हा एकदा बाबर आझमला भेटण्यासाठी पुढे आला. त्यानंतर सुरक्षारक्षक त्याला पकडून बाहेर घेऊन जातात. यावरून पाकिस्तानातील स्टेडिमयमध्ये खेळाडू सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
ज्यावेळी तो क्रिकेट चाहता बाबर आझमला भेटण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये आला, त्यावेळी बाबर आझम आतमध्येच होता. पण त्याला बाहेर काय घडत होतं याबाबत कल्पना नव्हती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून याबाबत कुठलीही अपडेट आलेली नाही. पण घडलेल्या घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला ट्रोल केलं जात आहे.