Sanjay Manjrekar vote for Hardik Pandya : टी-२० विश्वचषक २०२४ रविवारी (२ जून) पासून सुरू होणार असून टीम इंडियाने अद्याप प्लेइंग इलेव्हनच्या खेळाडूंचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ही त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. ओपनिंग स्लॉटसह काही महत्त्वाच्या क्रमांकाबाबत मोठे निर्णय घ्यावे लागतील. सलामीच्या दावेदारांमध्ये यशस्वी जैस्वाल, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. कोहलीला कुठे खेळवायचे हे कर्णधार आणि प्रशिक्षकाला ठरवावे लागेल. सलामीवीर म्हणून किंवा तिसऱ्या क्रमांकावर. कोहलीने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. अशात माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी हार्दिक पंड्या आणि शिवम दुबेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियासाठी चिंतेचे आणखी एक मोठे क्षेत्र म्हणजे गोलंदाजी संयोजन आहे. भारतीय खेळाडूंनी अमेरिकेच्या भूमीवर फारसे क्रिकेट खेळलेले नाही आणि संघ ग्रुप स्टेजपूर्वी एकच सराव सामना खेळणार आहे. त्यामुळे आपल्या फलंदाजीची खोली वाढवण्यासाठी टीम इंडिया यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सुरुवातीच्या फळीत समावेश करू शकतो. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे हे पाचवे गोलंदाज म्हणून पाहिले जाऊ शकतात.

संजय मांजरेकर हार्दिकबद्दल काय म्हणाले?

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी सांगितले की, हार्दिकची आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहता, मी शिवम दुबेऐवजी पंड्याला प्राधान्य देईल. २०१६ मध्ये भारतीय संघात सामील झाल्यापासून पंड्याने सर्व फॉरमॅटमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. तथापि, २०१८ आशिया चषक स्पर्धेत पाठीच्या दुखापतीमुळे आणि २०१९ विश्वचषकातील शस्त्रक्रियेमुळे, तो त्याच्या सर्वोत्तम कामगिरीकडे परत येऊ शकला नाही. तसेच २०२१ च्या टी-२० विश्वचषकात फक्त एक फलंदाज म्हणून खेळला जिथे भारत उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही.

हेही वाचा – “…म्हणून युवा वेगवान गोलंदाजांना जास्त शिकवण्याचा प्रयत्न करत नाही”: जसप्रीत बुमराह असं का म्हणाला? जाणून घ्या

माझे मत नेहमीच हार्दिक पंड्याला असेल –

संजय मांजरेकर म्हणाले, “माझे मत नेहमीच हार्दिक पंड्याला असेल. मला माहित आहे की यावेळी आयपीएलचा हंगाम त्याच्यासाठी खास गेला नाही, परंतु भारताच्या शेवटच्या टी-२० विश्वचषक सामन्यात इंग्लंड विरुद्ध ॲडलेडमध्ये हार्दिकने १९० च्या स्ट्राइक रेटने सुमारे ३० चेंडूंमध्ये ६० धावा केल्या होत्या, जेव्हा भारताने पहिल्या १० षटकांत ६२ धावा केल्या होत्या. त्यामुळे जेव्हा टी-२० विश्वचषक आणि मोठ्या स्पर्धांचा विचार केला जातो, तेव्हा तुम्ही मोठ्या टप्प्यावर चमकलेल्या खेळाडूंना पाठिंबा देता. त्यामुळे माझ्यासाठी हार्दिक पंड्या किंवा ऋषभ पंत सारखे खेळाडू शिवम दुबे सारख्या लोकांपेक्षा नेहमीच पुढे असतील, जोपर्यंत शिवम मोठ्या मंचावर कामगिरी करत नाही.”

हेही वाचा – T20 World Cup : ॲक्शन…थ्रिलर…रोमांच, सर्व काही एकाच सामन्यात, जाणून घ्या भारताने २००७ ची फायनल कशी जिंकली?

सहावा गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्या असायला हवा –

माजी खेळाडू पुढे म्हणाले, “हार्दिक पंड्या तुमचा पाचवा गोलंदाज होऊ शकत नाही. मला वाटतं भारताकडे सहावा गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्या असायला हवा. कारण त्याने खूप आणि सर्व फिटनेस समस्यांसह गोलंदाजी केली आहे. त्यामुळे मी फिरकीवर थोडे अधिक लक्ष केंद्रित करू इच्छितो. कारण जेव्हा तुम्ही भारताच्या सीमचा दर्जा पाहता तेव्हा तिथे जास्त खोली नसते. मोहम्मद शमी असता तर भारताच्या गोलंदाजीचे स्वरूप पूर्णपणे बदलले असते. त्यामुळे, जेव्हा तुमच्याकडे काही चांगले फिरकीचे पर्याय असतील, तेव्हा मी अतिरिक्त स्पिनरसह जाण्यास प्राधान्य देईन.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya cant be your fifth bowler sanjay manjrekar fires big warning to rohit sharma and co ahead of t20 wc 2024 vbm