Premium

WTC 2023: “राष्ट्रगीतावेळी दिसणारा जोश मैदानात दाखवता येत नसेल तर…”, मॅथ्यू हेडनची रोहित ब्रिगेडवर सडकून टीका

India vs Australia, WTC 2023 Final: WTC फायनलमध्ये पहिल्या दिवसअखेर कांगारूविरुद्ध टीम इंडियाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने रोहित शर्मा आणि कंपनीला फटकारले.

At the end of the first day in the WTC final, Team India did not perform well against the against Australia Matthew Hayden slammed Team India
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने रोहित शर्मा आणि कंपनीला फटकारले. सौजन्य- (ट्वीटर)

WTC 2023 Final India vs Australia: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दुस-या दिवशी रोहित शर्मा आणि कंपनीने प्रभावी झुंज देण्यापूर्वीचं माघार घेतली की काय अशी परिस्थिती दिसत आहे. तत्पूर्वी, ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या दिवसअखेर चांगल्या स्थितीत नेले होते. ट्रॅव्हिस हेडचे दमदार शतक आणि माजी कर्णधार स्मिथच्या शानदार खेळीने ओव्हलवर सुरु असणाऱ्या WTC फायनलच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने बाजी मारली, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओव्हलवरील भारताच्या कामगिरीवर विचार करताना, ऑस्ट्रेलियाचा माजी महान सलामीवीर मॅथ्यू हेडनने टीम इंडियावर नाराजी व्यक्त केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या दिवशी तितकासा उत्साह त्याला दिसला नाही. यामुळे त्याने रोहित आणि कंपनीला चांगलेच फटकारले आहे. माजी ऑसी सलामीवीराने असे निरीक्षण नोंदवले आहे की, “क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या भारतीय खेळाडूंकडे पुरेशी ऊर्जा नव्हती.” WTC फायनलच्या या महामुकाबल्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर मैदानात टीम इंडियामध्ये ऊर्जेची कमतरता जाणवत होती.”

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: शुबमन-पुजाराला काढले मुर्खात! काही कळण्याच्या आत झाली दांडी गुल, टीम इंडिया अवस्था बिकट; पाहा Video  

हेडनने स्टार स्पोर्ट्सला बोलताना सांगितले, “भारताचे राष्ट्रगीत म्हणत असताना जेवढी तुमची छाती अभिमानाने भरून येते. राष्ट्रगीत म्हणताना जेवढा तुमच्यात जोश असतो तेवढाच जोश तुम्ही मैदानात दाखवला पाहिजे. फक्त अभिमानाने उर भरून येण्यापेक्षा मैदानावर तुमची सर्वोत्तम कामगिरी बघून तुमच्या देशबांधावाची छाती अभिमानाने भरून आली पाहिजे. काल मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या भारतीय संघाकडे पुरेशी ऊर्जा नव्हती. संपूर्ण पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने वर्चस्व गाजवले. टीम इंडियाने जराही वेगळा विचार करून विकेट घेण्याचा विचार केला नाही, रोहित ब्रिगेडचे खांदे पडलेले होते.”

WTC फायनलच्या पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी करताना, हेडने १४६ धावांची धडाकेबाज खेळी केली तर स्मिथने देखील त्याचे शतक पूर्ण केले. WTC फायनलच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ३ बाद ३२७ धावा केल्या. एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला खेळवण्यासाठी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज रविचंद्रन अश्विनला वगळण्याचा निर्णय भारतावरच उलटला. हेड आणि स्मिथ यांनी चौथ्या विकेटसाठी ३७० चेंडूत २५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचल्यानंतर ओव्हलवर पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत पोहोचली.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: “टीम इंडियाने विजयाची संधी हुकवली!” हे काय बोलून गेला माजी दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू

हेडन पुढे बोलताना म्हणतो, “ मोठ्या प्रमाणावर नाव कमावलेली टीम इंडिया नेहमी एकच गोष्ट करत आली आहे. यश मिळत नसले तरी एकाच प्लॅनला चिकटून रहा आणि जोपर्यंत शिकार स्वत:हून हातात येत नाही तोपर्यंत वाट पाहत रहा. जर टीम इंडियाने यामध्ये बदल केला नाही तर याचे मोठ्या प्रमाणावर परिणाम त्यांना भोगावे लागू शकतात. भारतीय गोलंदाज एकाच लेंथवर चेंडू टाकत. फक्त शॉर्ट चेंडू टाकून विकेट्स मिळत नसतात. हे जितके लवकर समजेल तितके भारताला या सामन्यात टिकून राहता येईल अन्यथा ऑस्ट्रेलिया संघ या सामन्याचा बॉस ठरेल.” 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 22:23 IST
Next Story
WTC Final IND vs AUS: शुबमन-पुजाराला जाळ्यात अडकवलं! काही कळण्याच्या आत झाली दांडी गुल, टीम इंडियाची अवस्था बिकट; पाहा Video