IND vs AUS 5th Test Australia need 162 runs win Sydney Test : सिडनी कसोटीत भारताचा दुसरा डाव १५७ धावांवर आटोपला. टीम इंडियाकडे पहिल्या डावात ४ धावांची आघाडी असल्याने ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात विजयासाठी १६२ धावाचं लक्ष्य देण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना धावफलकावर केवळ १६ धावा लावता आल्या आणि या १६ धावांतच शेवटच्या ४ विकेट्स गमावल्या. भारतासाठी दुसऱ्या डावातील सर्वाधिक धावा ऋषभ पंतने केल्या, ज्याने दुसऱ्या दिवशी अवघ्या ३३ चेंडूत ६१ धावांची शानदार खेळी साकारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाला मिळाले १६२ धावांचे लक्ष्य –

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर पहिल्या डावात १८१ धावा केल्या. जेव्हा ऑस्ट्रेलियाची पाळी आली तेव्हा त्यांचा डाव १८१ धावांवर गडगडला. ज्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ ४ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्याच दिवशी भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली, पण फलंदाजांनी पुन्हा संघर्ष केला. मात्र, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने संघाला वेगवान सुरुवात करून दिली आणि ८व्या षटकातच ४२ धावा केल्या होत्या.

जैस्वालने २२ तर राहुलने १३ धावा केल्या. विराट कोहली आणि शुबमन गिलही स्वस्तात परतले. पण ऋषभ पंतच्या शानदार खेळीने या सामन्यात भारताचे दमदार पुनरागमन केले. पंतने दुसऱ्या दिवशी अवघ्या ३३ चेंडूत ६१ धावा केल्या आणि या डावात ६ चौकार आणि ४ षटकारही मारले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ६ गडी गमावून १४१ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs AUS : ‘जर बुमराह तंदुरुस्त नसेल तर २०० धावाही कमी…’, सुनील गावस्करांच्या वक्तव्याने भारतीय चाहत्यांची वाढली चिंता

आज भारताने ६ बाद १४१ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि १६ धावा करताना उर्वरित चार विकेट्स गमावल्या. रवींद्र जडेजा (१३) आणि वॉशिंग्टन सुंदर (१२) यांना कमिन्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर मोहम्मद सिराज (४) आणि जसप्रीत बुमराह (०) यांना स्कॉट बोलंडने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बोलंडने एकूण सहा विकेट घेतल्या. त्याचवेळी कमिन्सला तीन विकेट मिळाल्या. ब्यू वेबस्टरला एक विकेट मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 5th test india set australia a target of 162 runs to win in sydney test vbm