WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी पहिले सत्र संपेपर्यंत सहा गडी गमावत २६० धावा केल्या आहेत. मराठमोळ्या रहाणे- शार्दुल जोडीने कांगारूंना पाणी पाजले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. करिअर संपले म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याचे शतक मात्र थोडक्यात हुकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाच्या वरच्या फळीच्या फलंदाजांनी घोर निराशा केल्यावर दोन मराठमोळ्या खेळाडूंनी भारताला सावरले. दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५१ अशी भारताची स्थिती होती. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांच्यासारखे धुरंधर फलंदाज स्वस्तात माघारी परतले. रवींद्र जाडेजाने ४८ धावांची झुंज दिली. पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. तिसऱ्या दिवशी मात्र के.एस. भरत बाद झाल्यानंतर, दिवसाचे पहिले सत्र संपेपर्यंत अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर या महाराष्ट्रीयन जोडीने खेळपट्टीवर जम बसवला आहे.

हेही वाचा: IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये अजिंक्य रहाणे रचला इतिहास, भारतासाठी ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय

दोघांनाही ऑस्ट्रेलियाकडून एक-एक जीवदान मिळाले. त्याचा त्यांनी योग्य वापर केला. रहाणे ८९ धावांवर बाद झाला असून शार्दुल नाबाद ३६ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला जोडी फोडण्यात यश आले आहे. २६१ धावांच्या स्कोअरवर भारताची सातवी विकेट पडली. अजिंक्य रहाणे १२९ चेंडूत ८९ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत ११ चौकार आणि १ षटकार मारला. पॅट कमिन्सने त्याला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले.

शार्दुल आणि रहाणे यांच्यात शतकी भागीदारी

शार्दुल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे यांच्यात सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली आहे. रहाणेने आपले अर्धशतक केले. या दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताची धावसंख्या सहा गड्यांच्या मोबदल्यात २६० धावांच्या पुढे गेली आहे. आता भारतीय संघाकडून फॉलोऑनचा धोका जवळपास टळला आहे. मात्र, टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरपेक्षा २०९ धावांनी मागे आहे.

रहाणेने कसोटी कारकिर्दीत ५००० धावा पूर्ण केल्या

अजिंक्य रहाणेने या सामन्यात शानदार फलंदाजी करत कसोटी कारकिर्दीतील ५००० धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने शार्दुल ठाकूरसोबत शानदार भागीदारी करून भारताला संकटातून बाहेर काढले. ऑस्ट्रेलियाच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे दोन्ही खेळाडूंना जीवदानही मिळाले आहे. ५७ षटकांनंतर भारताची धावसंख्या ६ बाद २४४ आहे.

तत्पूर्वी, शार्दुलने सुरूवातीच्या काळात थोडीशी सांभाळून फलंदाजी केली. त्याचे दोन-तीन वेळा ऑस्ट्रेलियाकडून झेल सुटले त्यामुळे त्याला त्याचा फायदा झाला. इतकेच नव्हे तर एका चेंडूवर तो पायचीत झाला होता त्यावेळी पॅट कमिन्सचा नो बॉल असल्याने तो वाचला. तेच शार्दुलच्या बाबतीतही झाले. तो बाद होता मात्र त्यावेळी नो बॉल निघाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus indias seventh wicket fell for 261 runs ajinkya rahane miss his century cot out by 89 runs avw