Virat Kohli Viral Photos: विराट कोहली हे नाव जर आपण फिटनेस, एनर्जी, स्टॅमिना या शब्दांसाठी समानार्थी म्हणून वापरले तर काही अपवाद ठरणार नाही. भारताचा माजी कर्णधार विराट धावा करो अथवा करू नये त्याच्या नावाची चर्चा मात्र कधीच कमी नव्हती. थोडं भूतकाळात जाऊन पाहिलं तर तीन वर्षांपूर्वी कोहलीने पाठदुखीच्या समस्येमुळे पुन्हा आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करू शकत नाही असे सांगितले होते तेव्हा तो ३० वर्षांचा होता मात्र आता सगळ्या दुखापतींवर मात करून कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला ३० मिनिट गोलंदाजी करून आपल्या सहखेळाडूंना सुद्धा थक्क केले. इतकंच नव्हे तर याआधी त्याने जवळपास तासभर प्रत्येक आघाडीच्या गोलंदाजाला नेटमध्ये चांगले धुवून काढले होते आणि यानंतरही क्षेत्ररक्षणासाठी धावण्याची त्याच्यात कमाल उर्जा होती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T २० सामन्यापूर्वी सोमवारी कोहली त्याच्या क्रॉस-लेगच्या जवळ गोलंदाजी करण्याच्या स्टाईलचा सराव करताना दिसला. गेल्या काही वर्षांत कोहलीची नेटमध्ये गोलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. प्रामाणिकपणे सांगायचे तर तो याआधीही अनेकदा मैदानात गोलंदाजी करताना दिसला आहे परंतु फॉर्म बिघडल्यापासून आता पहिल्यांदाच कोहलीचा हा बिनधास्त अंदाज पाहायला मिळाला. कोहलीने आजवर टी २० मध्ये चार विकेट घेतल्या आहेत.

मोहालीतील सामन्यात कशी असेल खेळपट्टी, किती होईल धावसंख्या जाणून घ्या पीच रिपोर्ट

दरम्यान, ठरल्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात कोहली तिसरा सलामीवीर असेल पण या सरावाचा व्हिडीओ पाहता रोहित शर्मासाठी आता कोहली सहावा किंवा सातवा गोलंदाजी पर्याय दिसणार का? असाही प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडू लागला आहे.

फक्त गोलंदाजी नव्हे सगळं करणार कोहली

मोहाली येथील सरावात कोहलीने फक्त गोलंदाजीच नव्हे तर नाचून, खेळून, स्पर्धा लावूनही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सरावानंतर इतर सर्व थकले असताना कोहलीने मात्र सर्वांना पुश अप चॅलेंज देऊन हरवून दाखवले. याआधी मस्त बॉलिवूड गाण्यावर थिरकतानाही त्याची ऊर्जा दिसून आली. एकूण काय तर कोहली भारतीय संघातील एक संपूर्ण पॅकेज आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याची बॅट व कदाचित गोलंदाजीही काय कमाल दाखवतेय हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus virat kohli likely to bowl for team hardik pandya shocked looking at kohlis practice session see photos svs