IND vs BAN Champions Trophy 2025 Highlights: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धच्या सामन्याने मोहिमेला विजयी सुरूवात केली आहे. भारताचा हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिमयवर खेळवला गेला. या सामन्यात शुबमन गिलचे शतक आणि मोहम्मद शमीच्या ५ विकेट्सच्या जोरावर भारताने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव केला. शुबमन गिल शतक झळकावत शेवटपर्यंत नाबाद राहिला. तर रोहित शर्मा (४१) आणि केएल राहुल (४१) यांनी चांगली फलंदाजी केली. भारताने विजयाने सुरूवात करत अ गटातील गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे.
IND vs BAN Live score: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांगलादेशचा संघ
सौम्या सरकार, तंजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), झाकेर अली (यष्टीरक्षक), मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, तन्झीम हसन साकिब, नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान, तौहीद हृदोय, रिशाद हुसैन एमोन, परवेझ, नसुम अहमद
IND vs BAN Live score: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर
IND vs BAN Live score: भारत वि बांगलादेश
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील दुसरा सामना भारत वि. बांगलादेश या संघांमध्ये खेळवला जात आहे. तर भारत आणि बांगलादेश या संघांचा हा आयसीसी स्पर्धेतील पहिलाच सामना असणार आहे.
India vs Bangladesh Highlights: भारत वि बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्याचे हायलाईट्स