IND vs ENG 1st test 2nd Day Highlights: इंग्लंड संघाने भारताला ४७१ धावांवर सर्वबाद केल्यानं दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला. यानंतर जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात जॅक क्रॉलीला झेलबाद करत पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर बेन डकेट-ऑली पोप यांनी अर्धशतकं झळकावली. टीब्रेकनंतर जकेट बुमराहच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. तर ऑली पोप भारतीय संघाविरूद्ध शतक झळकावलं. त्यानंतर रूट झेलबाद झाला. अखेरच्या षटकात बुमराहने ३ नो बॉल टाकले पण हॅरी ब्रुकला एकही धाव दिली नाही.
जो रूट झेलबाद
ओली पोपच्या शतकानंतर दुसऱ्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने जो रूटला झेलबाद केलं. रूटच्या बॅटची कड घेत चेंडू करूण नायरच्या हातात पोहोचला आणि रूटने आपली विकेट गमावली. भारतासाठी ही खूप महत्त्वाची आहे.
इंग्लंडच्या २०० धावा पूर्ण आणि ओली पोपचं शतक
बेन डकेटच्या विकेटनंतर ओली पोप आणि जो रूटच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर संघाला पहिल्याच दिवशी २०० धावांचा टप्पा गाठून दिला. तर ओली पोपने १२५ चेंडूत १३ चौकारांसह १०० धावा करत आपलं शतक पूर्ण केलं.
दुसरी विकेट
लंचब्रेकनंतर ओली पोपने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि इंग्लंडकडून शतकी भागीदारीमध्ये धावांची भर घातली. यानंतर बुमराहने २९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डकेटला क्लीन बोल्ड करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. तर बुमराहच्या ३१व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने अजून कॅच ड्रॉप केला. आजच्या दिवसभरातील बुमराहच्या गोलंदाजीवरील ही तिसरी कॅच भारतीय फिल्डर्सकडून ड्रॉप करण्यात आली आहे.
टीब्रेक
भारतीय संघाने दोन कॅच सोडत बेन डकेटला जीवदान दिलं आणि त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतकही झळकावलं. टीब्रेकपर्यंत इंग्लंडने २४ षटकांत १ बाद १०७ धावा केल्या आहेत. ओली पॉप ४८ धावा तर डकेट ५३ धावावंर खेळत आहेत.
भारताने दोन झेल सोडले
जसप्रीत बुमरहाच्या दोन षटकांत बेन डकेटचे दोन झेल ड्रॉप करत भारताने त्याला जीवदान दिलं आहे. यासह आाता १३ षटकांत इंग्लंडने १ विकेट गमावत ६७ धावा केल्या आहेत.
बुमराहची जादू, पहिल्या षटकात पहिली विकेट
पावसामुळे इंग्लंडचा डाव उशिराने सुरू झाला. बुमराह पहिलंच षटक टाकण्यासाठी आला. पहिले ३ चेंडू डॉट गेल्यानंतर चौथ्या चेंडूवर स्लिपमधून चौकार गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर बुमराहने कमालीचा चेंडू टाकला क्राऊली तो चेंडू खेळायला गेला आणि बॅटची कड घेत स्लिपमध्ये गेला आणि करूण नायरने कोणतीही चूक न करता झेल टिपला. यासह भारताला पहिल्याच षटकात विकेट मिळाली.
सामन्याचा दुसरा डाव उशिराने सुरू होणार
भारताने केलेल्या ४७१ धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी इंग्लंडचे सलामीवीर मैदानात उतरले. भारताचे गोलंदाज आणि फिल्डर मैदानात सज्ज झाले. तितक्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आता सामना काही वेळाने सुरू होणार आहे.
भारत ऑल आऊट
लंचब्रेकनंतर भारताने झटपट उर्वरित ३ विकेट्स गमावले आणि ५०० धावांचा टप्पा गाठणारा भारतीय संघ ४७१ धावांवर सर्वबाद झाला. अखेरच्या काही षटकांमध्ये पावसानेही मैदानात हजेरी लावली. जोश टंगने भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही.
भारताला आठवा धक्का
५०० धावांचा टप्पा गाठण्यावर नजर असलेल्या भारतीय संघाला आठवा धक्का बसला आहे. लंचब्रेकनंतर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह फलंदाजीला आले. जोश टंगने ब्रेकनंतर दुसऱ्या षटकात बुमराहला स्लिमध्ये झेलबाद करत संघाला आठवी विकेट मिळवून दिली. सध्या मैदानावर जडेजा आणि सिराजची जोडी आहे. पावसाची चिन्हं असल्याने इंग्लंडमध्ये आभाळ भरून आलं आहे, त्यामुळे परिस्थिती बदलल्याने भारताने झटपट विकेट गमावल्या आहेत.
भारताने झटपट गमावले ३ विकेट्स
करूण नायरच्या विकेटनंतर भारताने ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूरच्या रूपात भारताचा डाव कोसळला आहे. भारताने लागोपाठ ३ विकेट्स गमावले. लंचब्रेकपूर्वी अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूर झेलबाद झाला. यासह भारताने लंचब्रेकपूर्वी ७ बाद ४५४ धावा केल्या आहेत.
करूण नायर अपयशी
करूण नायरला ८ वर्षांनी भारताच्या कसोटी संघात पुन्हा संधी मिळाली होती. मोठ्या प्रतिक्षेनंतर करूण नायरचं पुनरागमन झालं होतं. पण करूण नायर चौथ्याच षटकात खातंही न उघडता झेलबाद झाला. बेन स्टोक्सच्यो गोलंदाजीवर ओली पॉपने उत्कृष्ट झेल टिपत करूणला ४ चेंडू खेळत माघारी जावं लागलं.
शुबमन गिल झेलबाद
शुबमन गिल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. शोएब बशीरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला आणि डीप स्क्वेअर लेगच्या इथे जोश टंगने त्याला झेलबाद केलं. यासह शुबमन गिल २२७ चेंडूत १९ चेंडूत १ षटकार आणि १४७ धावा करत बाद झाला. यासह भारताने आतापर्यंत १०२ षटकांत ४ बाद ४३० धावा केल्या आहेत.
ऋषभ पंतचं विक्रमी शतक
भारताचा कसोटी उपकर्णधार ऋषभ पंतने उत्कृष्ट फलंदाजी करत शतक झळकावलं. गिल, जैस्वालनंतर ऋषभ पंतने पहिल्या सामन्यात शतक पूर्ण केलं. पंतने १४५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०३ धावा करत शतक पूर्ण केलं. या शतकासह तो सर्वाधिक शतकं करणारा भारतीय विकेटकिपर फलंदाज ठरला. पाहा ऋषभ पंतच्या शतकाचा व्हीडिओ
भारत ४०० धावांच्या पलीकडे
ऋषभ पंतने शोएब बशीरच्या षटकात चौकार-षटकार लगावत भारताला ४०० धावांचा पल्ला गाठून दिला. ऋषभ पंत यासह शतकापासून अवघ्या काही धावा दूर आहे. तर शुबमन गिल १५० धावांच्या जवळ पोहोचला आहे.
पहिल्या दिवसाचा लेखाजोखा
जैस्वाल आणि केएल राहुलने ९१ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर राहुल ४२ धावांवर बाद झाला. तर यशस्वी जैस्वालने इंग्लंडच्या भूमीवरील त्याचं पहिलं शतक झळकावलं. जैस्वाल बाद झाल्यानंतर कर्णधार-उपकर्णधाराची जोडी मैदानात खेळत होती. गिलने चौकार लगावत कर्णधार म्हणून पहिलं कसोटी शतक झळकावलं. यानंतर उपकर्णधार ऋषभ पंतने चौकार-षटकारांच्या फटकेबाजीसह वादळी अर्धशतक पूर्ण केलं. सध्या १९८ चेंडूत १३८ धावांची भक्कम भागीदारी करत दोन्ही फलंदाज मैदानावर नाबाद आहेत. गिल १२७ धावा तर ऋषभ पंत ६५ धावा करत नाबाद परतले आहेत. कर्णधार-उपकर्णधाराची जोडी दुसऱ्या दिवशी भारताचा डाव पुढे नेईल.