What ICC rules say about substitute fielder : भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन तिसऱ्या कसोटीतून अचानक बाहेर पडला. बीसीसीआयने सांगितले की, कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे अश्विनला राजकोटहून चेन्नईतील त्याच्या घरी परतावे लागले. यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खऱ्या कारणाला दुजोरा दिला. त्याने सांगितले की अश्विनची आई आजारी आहे. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाकडे तिसऱ्या कसोटीत फक्त १० खेळाडू शिल्लक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचबरोबर गोलंदाजाअभावी आता सर्व जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर आली आहे. आता प्रश्न असा पडतो की या कसोटीच्या उर्वरित भागात भारताला केवळ १० खेळाडूंसह खेळावे लागेल की अश्विनच्या जागी संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये देवदत्त पडिक्कलचा समावेश केला आहे. मात्र पर्यायी खेळाडूचा संघात समावेश करण्यासाठी आयसीसीचा नियम काय सांगतो, जाणून घेऊया.

बदली क्षेत्ररक्षकाला परवानगी मिळू शकते

नियमांनुसार अश्विनने पुनरागमन न केल्यास भारताला उर्वरित सामन्यांमध्ये केवळ १० खेळाडूंसह खेळावे लागले असते. अश्विनच्या अनुपस्थितीत टीम इंडियाकडे आता १० आउटफिल्ड खेळाडू आहेत. यापैकी चार स्पेशालिस्ट गोलंदाज आहेत. मॅरीलेबोन क्रिकेट क्लबच्या नियमानुसार, जर पंचांना स्पर्धेदरम्यान एखादा खेळाडू दुखापत झाला आहे किंवा तो आजारी पडला आहे असे समाधानी असेल, तर पंच बदली क्षेत्ररक्षकाला मैदानात उतरण्याची परवानगी देऊ शकतात.

हेही वाचा – विश्लेषण : फुटबॉल जगज्जेते, ऑलिम्पिक जेते ब्राझील पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र का ठरले? ‘सांबा’ला घरघर? 

आयसीसीचा नियम काय सांगतो?

एमसीसी नियम क्रमांक २४.१.१.२ नुसार, एक संघ ‘पूर्णपणे स्वीकार्य कारणास्तव’ पर्यायी क्षेत्ररक्षक देखील उतरवू शकतो. नियम २४.१.२ नुसार, बदली क्षेत्ररक्षक गोलंदाजी करू शकत नाही किंवा कर्णधार म्हणून काम करू शकत नाही, परंतु पंचांच्या संमतीनेच विकेटकीपर म्हणून काम करू शकतो. अश्विन आजारी किंवा दुखापत नसल्यामुळे, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या संमतीनंतरच भारताला राजकोटमध्ये पर्यायी क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी दिली जाईल.

बदली क्षेत्ररक्षकाचे काम काय असेल?

बदली क्षेत्ररक्षकाला उर्वरित सामन्यात फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. फक्त कन्कशनच्या बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची परवानगी आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला गोलंदाजाची उणीव भासू शकते. तसेच खालच्या फळीत चांगल्या फलंदाजाची कमतरता भासू शकते. भारताचा माजी कर्णधार कुंबळेला मागे टाकत अश्विन सर्वात वेगवान ५०० कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. एकूणच, तो श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर दुसरा जलद ५०० बळी घेणारा गोलंदाज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 3rd test match r ashwins withdrawal what icc rules say about substitute fielder vbm