Asia Cup 2023 India vs Pakistan Head-to-Head Record: बुधवारपासून (३० ऑगस्ट) आशिया कपला सुरुवात झाली. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. दोन्ही संघ चार वर्षांनंतर एकदिवसीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत. २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने शेवटच्या वेळी मँचेस्टरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. आशिया चषक ही भारतीय संघाला विश्वचषकाच्या तयारीसाठी शेवटची संधी आहे. अशा स्थितीत पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला हरवून तिला स्पर्धेत चांगली सुरुवात करायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहा वर्षांपासून भारत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध हरलेला नाही. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत त्यांचा शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर भारताने आशिया चषक २०१८ मध्ये आणि एकदा विश्वचषक २०१९ मध्ये पाकिस्तानला दोनदा पराभूत केले आहे. गेल्या १० सामन्यांबद्दल जर बोलायचे झाले तर भारताने सात सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या एकदिवसीय आशिया चषकात भारताला पाकिस्तानकडून शेवटचा पराभव पत्करावा लागला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचे १० एकदिवसीय सामने

वर्षमालिका/टूर्नामेंटपरिणाम
२०१९विश्वचषकभारत ८९ धावांनी जिंकला
२०१८आशिया कपभारत ९ विकेट्सने जिंकला
२०१८आशिया कपभारत ८ विकेट्सने जिंकला
२०१७चॅम्पियन्स ट्रॉफीपाकिस्तान १८० धावांनी विजयी
२०१७चॅम्पियन्स ट्रॉफीभारत १२४ धावांनी जिंकला
२०१५विश्वचषकभारत ७० धावांनी जिंकला
२०१४आशिया कपपाकिस्तान एक विकेटने विजयी
२०१३चॅम्पियन्स ट्रॉफीभारत ८ विकेट्सने जिंकला
२०१३द्विपक्षीय मालिकाभारत १० धावांनी जिंकला
२०१३द्विपक्षीय मालिकापाकिस्तान ८५ धावांनी विजयी

आशिया कपमध्ये हेड टू हेड

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान १३ वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यावर थोडीशी आघाडी कायम ठेवली आहे. त्याने १३ पैकी ७ सामने जिंकले आहेत, दुसरीकडे पाकिस्तानने ५ सामने जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.

हेही वाचा: IND vs PAK: “तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ IPL खेळत असलात तरी…” पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने टीम इंडियावर साधला निशाणा

एकदिवसीय सामन्यांमध्ये हेड टू हेड

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १३२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान पाकिस्तानने ७३ सामने जिंकले आहेत. भारताने केवळ ५५ सामने जिंकले आहेत. चार सामन्यांचा निकाल लागला नाही.

हेही वाचा: PAK vs NEP: नंबर १ पाकिस्तानला एक रन घेणं पडलं महाग, रोहितचा रॉकेट थ्रो अन् इमाम उल हक थेट तंबूत; पाहा Video

आशिया कपसाठी दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. बॅकअप: संजू सॅमसन.

पाकिस्तानः अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरीस, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ , हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak head to head india has not lost against pakistan in odis for six years such is the record in asia cup avw