India vs Pakistan: आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान २ सप्टेंबरला भिडणार आहेत, त्याआधी दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. या एपिसोडमध्ये आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने दावा केला आहे की, बाबर आझम अँड कंपनीची मिडल ऑर्डर ही भारतापेक्षा चांगली आहे. बासित यांच्या मते, टीम इंडिया अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने कामगिरी करत आहे, त्यावरून असे दिसते की आशिया कपमध्ये भारताला मिडल ऑर्डरमध्ये अडचणी येऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर आहे. के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर देखील दुखापतीमुळे बराच काळ बाहेर आहेत. लोकेश राहुल आशिया चषकात पुनरागमन करू शकतो पण तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. जरी आशिया चषकात त्याला थेट प्रवेश मिळाला तरी तो सामन्यासाठी कितपत तंदुरुस्त आहे आणि कोणत्या फॉर्ममध्ये आहे? हे पाहावे लागेल. आशिया चषकात भारताचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी कँडी येथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अली या सामन्याबद्दल उत्सुक आहे. रोहित शर्मा आणि संघाची मधली फळी हा सध्या चिंतेचा विषय असल्याचे त्यांचे मत आहे.

हेही वाचा: Team India: आशिया चषकात १५ नव्हे १७ सदस्यीय संघ पाठवणार? BCCIच्या नव्या प्रयोगामागे काय आहे कारण, जाणून घ्या

बासित अली यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “आमच्याकडे बाबर आझम, फखर जमान, इमाम आणि रिझवान हे आघाडीचे फलंदाज आहेत. इफ्तिखार अहमद आणि सलमान अली मधल्या फळीत तर शादाब खान आणि मोहम्मद नवाज खालच्या फळीत आहेत. भारतापेक्षा आमची मधली फळी चांगली आहे. इशान किशन पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो का हे पाहावे लागेल. इशान कसा परफॉर्म करेल याची कल्पना नाही. भारत तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्माला आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी विराट कोहलीला मैदानात उतरवू शकतो.”

बासित पुढे म्हणाले, “भारताचे अव्वल तीन फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल हे जर चांगल्या फॉर्ममध्ये असतील तर कोणत्याही संघाला भारताला हरवणे फार कठीण जाईल. ते पुढे म्हणाले की, “टीम इंडियाकडे ३ अव्वल दर्जाचे फलंदाज आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल पण चौथ्या, पाच आणि सहाव्या क्रमांकावर त्यांना अजूनही फलंदाज मिळाले नाहीत, त्यामुळे जर यांना लवकर बाद केले तर टीम इंडिया अडचणीत येईल.”

हेही वाचा: ICC WC 2023: BCCIसाठी पाकिस्तान ठरतोय डोकेदुखी, वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात पुन्हा बदल होणार? HCAने दिले ‘हे’ कारण

आशिया कपसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, युजवेंद्र चहल, के.एल. राहुल (यष्टीरक्षक/फिटनेसवर अवलंबून), श्रेयस अय्यर (फिटनेसच्या अवलंबून)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak pakistans middle order is better than india claims former pak player avw