Nitish Kumar Reddy Catch Video: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डाव वेस्टइंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने पहिला डाव ५ गडी बाद ४४८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी वेस्टइंडिजला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. तेगनारायणत चंद्रपॉल स्वस्तात बाद होऊन माघारी परतला. दरम्यान त्याला बाद करण्यासाठी नितीश रेड्डीने डाईव्ह मारून भन्नाट झेल घेतला.
नितीश कुमार रेड्डीचा भन्नाट झेल
या सामन्यातील पहिल्या डावात १६२ धावांवर गारद होणाऱ्या वेस्टइंडिज संघाला तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. पण या डावातही वेस्टइंडिजला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. वेस्टइंडिजला सुरूवातीलाच २ मोठे धक्के बसले. पहिल्या डावात स्वस्तात माघारी परतलेला तेगनारायण चंद्रपॉल दुसऱ्या डावातही चांगली सुरूवात करून देऊ शकलेला नाही.
नितीश कुमार रेड्डीचा भन्नाट झेल
तर झाले असे की, भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात ८ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला. त्यावेळी तेगनारायण चंद्रपॉल स्ट्राईकवर होता. डावखुऱ्या हाताच्या चंद्रपॉलला सिराजने राऊंड द विकेटने मारा करत शॉर्ट चेंडू टाकला. हा चेंडू चंद्रपॉलने चांगला टाईम करत पुल केला. चेंडू बॅटच्या मध्यभागी लागला. पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या नितीश कुमार रेड्डीने त्याहून चांगला टायमिंग साधत चित्त्यासारखी डाईव्ह मारली आणि भन्नाट झेल घेतला. नितीश रेड्डीने ३ फूट हवेत उडून डाव्या बाजूला डाईव्ह मारून हा झेल घेतला. हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यासह चंद्रपॉलचा डाव अवघ्या ८ धावांवर आटोपला.
भारतीय संघाने उभारला ४४८ धावांचा डोंगर
या सामन्यातील पहिल्या डावात वेस्टइंडिजचा डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने ३६ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने दमदार शतक झळकावलं. तर शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. तर ध्रुव जुरेलने १२५ धावांची खेळी केली. शेवटी रवींद्र जडेजा १०४ धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाने मोठी आघाडी घेऊन पहिला डाव ५ गडी बाद ४४८ धावांवर घोषित केला.