India vs New Zealand ODI Series श्रीलंकेविरुद्ध निर्भेळ यश संपादन केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून बुधवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत त्यांचे कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य असेल. हैदराबाद येथे होणाऱ्या या सामन्यात इशान किशनला मधल्या फळीत संधी मिळणे अपेक्षित आहे. त्याचा या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न असेल.

या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने आता प्रत्येकच सामन्याचे महत्त्व वाढले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दर्जेदार कामगिरी केली. फलंदाजीत रोहित, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी, तर गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी चमक दाखवली. मात्र, आता तुल्यबळ न्यूझीलंडकडून भारताला अधिक आव्हान मिळणे अपेक्षित आहे.

वेळ : दुपारी १.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, हिंदूी