India vs Australia 1st T20 Highlights, 23 November 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सुरुवात झाली. उभय संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने २० षटकात तीन विकेट गमावत २०८ धावा केल्या. प्रत्युतरात टीम इंडियाने १९.५ षटकांत आठ विकेट गमावत २०९ धावा करत सामना जिंकला. रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण शॉन अॅबॉटचा चेंडू नो-बॉल होता. अशा स्थितीत रिंकूच्या खात्यात या सहा धावा जमा झाले नाहीत. त्याचबरोबर नो-बॉलची एक धाव मिळाल्याने टीम इंडिया विजय ठरली.
IND vs AUS T20 Highlights : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकानंतर रिंकू सिंगच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २ गडी राखून विजय मिळवला.
विशाखापट्टणम म्हणजेच विझागची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे मानली जाते, परंतु या खेळपट्टीवर झालेल्या तीन टी-२० सामन्यांवर जर नजर टाकली तर आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. २०१६ मध्ये येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मध्ये श्रीलंकेचा संघ अवघ्या ८२ धावांत सर्वबाद झाला आणि भारताने हा सामना सहज जिंकला. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी ७ विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ १२६ धावा करू शकला आणि अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना समान मदत मिळाली आहे. मात्र, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० मध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना १७९ धावा केल्या आणि भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना १३१ धावांत गुंडाळले.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, शॉन अॅबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झम्पा.
नुकतेच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेला भारतीय संघ गुरुवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. विशाखापट्टणम येथे होणारा पहिला सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, तर नाणेफेक त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ६.३० वाजता होईल.
Get. Set. GO ?
— BCCI (@BCCI) November 23, 2023
T20I Mode ?#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/n4Watr5K4o
IND vs AUS T20 Highlights : प्रथमच राष्ट्रीय संघाचे कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांची अर्धशतके आणि दोघांमध्ये शतकी भागीदारी यांच्या जोरावर भारताने गुरुवारी येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात जोश इंग्लिसला आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या जोरावर पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्स राखून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे..