India vs Bangladesh ICC Cricket World Cup 2023 Highlights: आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्ताननंतर आता भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला आहे. अशा प्रकारे टीम इंडियाने सलग चौथा विजय नोंदवला. आता भारताचे ४ सामन्यांत ८ गुण झाले आहेत. मात्र, भारतीय संघ अजूनही गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचेही ४ सामन्यात ८ गुण आहेत, मात्र टीम इंडियापेक्षा चांगल्या नेट रनरेटमुळे किवी संघ अव्वल स्थानावर आहे.
CWC 2023 India vs Bangladesh Highlights in Marathi: आज पुण्यातील एमसीए स्टेडियमवर भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला.
विराट कोहलीने केवळ षटकार मारून आपले शतक पूर्ण केले नाही तर भारताला विजयही मिळवून दिला. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील 48 वे शतक झळकावले. भारताने 257 धावांचे लक्ष्य 41.3 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. विश्वचषकात भारताचा हा सलग चौथा विजय आहे. पॉइंट टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानावर आला आहे. भारतासाठी आता उपांत्य फेरीचा मार्ग सोपा झाला आहे.
???????!
— BCCI (@BCCI) October 19, 2023
Number 4⃣8⃣ in ODIs
Number 7⃣8⃣ in international cricket
Take a bow King Kohli ??#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MenInBlue pic.twitter.com/YN8XOrdETH
विराट आणि राहुलमध्ये अर्धशतकी भागीदारी
विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या गतीने धावा करत असून टीम इंडिया विजयाच्या जवळ आहे.
भारताची धावसंख्या २०० धावा पार
भारताच्या धावसंख्येने तीन विकेट गमावून २०० धावा पार केल्या आहेत. विराट कोहली आणि लोकेश राहुलने भारतीय डावाची धुरा सांभाळली असून टीम इंडिया विजयाच्या जवळ येत आहे. विराटलाही शतक पूर्ण करण्याची संधी आहे.
CWC2023. 34.4: Shoriful Islam to K L Rahul 4 runs, India 206/3 https://t.co/h882jYKkfB #INDvBAN #CWC23
— BCCI (@BCCI) October 19, 2023
भारताची तिसरी विकेट पडली
श्रेयस अय्यरला मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. अय्यर १९धावा करून बाद झाला. भारताची धावसंख्या १७८आहे. २९.१ षटकांचा खेळ पूर्ण झाला. कोहलीला साथ देण्यासाठी राहुल क्रीझवर आला आहे.
विराट कोहलीने चालू विश्वचषकात तिसरे अर्धशतक झळकावले आहे. हा दिग्गज खेळाडू पाकिस्तानविरुद्ध वगळता सर्व सामन्यांमध्ये खेळला आहे. त्याने ४८ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार मारत आपल्या ५० धावा पूर्ण केल्या. त्याचबरोबर त्याने वनडेतील आपले ६९ वे अर्धशतक पूर्ण केले.
5⃣0⃣ & counting! ?
— BCCI (@BCCI) October 19, 2023
Virat Kohli reaches his 69th half-century ??
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#TeamIndia | #CWC23 | #INDvBAN | #MenInBlue pic.twitter.com/S221nwJBwY
भारताच्या धावसंख्येने दोन विकेट गमावून १५० धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत. दोघेही वेगाने धावा काढत आहेत. टीम इंडिया सहज लक्ष्याच्या जवळ येत आहे. २५ षटकांनंतर भारताची धावसंख्या १६१/२ आहे.
CWC2023. 19.6: Mehidy Hasan Miraz to Shreyas Iyer 4 runs, India 142/2 https://t.co/h882jYKkfB #INDvBAN #CWC23
— BCCI (@BCCI) October 19, 2023
शुबमन गिल बाद झाला
आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर गिल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. १९.२ षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन विकेट गमावून १३२ धावा आहे. गिलने ५३धावा केल्या. विराटला साथ देण्यासाठी अय्यर क्रिजवर आला आहे.
https://twitter.com/Shahmirabrar1/status/1715012122000900163
भारतीय कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीसह शुबमन गिलने डाव पुढे नेला. डेंग्यूमुळे पहिले दोन सामने खेळू न शकलेल्या या तरुणाने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावून विश्वचषकातील पहिली मोठी इनिंग खेळण्याचे खाते उघडले. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५० धावा पूर्ण केल्या.
रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आक्रमक सुरुवात केली. विराट १३ चेंडूत २० धावा केल्यानंतर खेळत आहे. १५.३ षटकांनंतर भारताची धावसंख्या एक विकेट गमावून ११२ धावा आहे. शुबमन गिल ४१ धावा करून क्रीजवर आहे.
Wow #ViratKohli what a Six#rohit already gave a destructive start#Bangladesh are well short here
— दिव्या अग्रवाल (@partimecricket) October 19, 2023
#naseer hhussain says this is a typical 320-360 wicket
they are 100 runs short???
wicket #INDvsBAN #CWC23 #BANvsIND #BANvIND #CricketTwitter? #CricketWorldCup2023 #jadeja pic.twitter.com/5zfxrP3Z17
रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या खेळीत पहिला षटकार मारताच, कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. मॉर्गनने २०१९ मध्ये कर्णधार म्हणून ६० षटकार मारले होते, परंतु रोहित शर्माने ६२ षटकार मारून त्याला मागे सोडले.
Most 6s as Captain in a Calendar year
— CricBeat (@Cric_beat) October 19, 2023
61 – Rohit Sharma (2023)*
60 – Eoin Morgan (2019)
59 – AB de Villiers (2015)
54 – B McCullum (2014)
53 – Chris Gayle (2009)
(Full member teams)#INDvsBAN
भारताची पहिली विकेट ८८ धावांवर पडली. रोहित शर्माचे अर्धशतक हुकले आहे. त्याने ४० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. हसन महमूदच्या चेंडूवर तो तौहीद हृदोयकरवी झेलबाद झाला.
Rohit Sharma doesn't play for himself..!#INDvsBAN pic.twitter.com/McOaxqG0YD
— Prathmesh. (@45Fan_Prathmesh) October 19, 2023
भारताची धावसंख्या ६० धावांच्या पार
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. भारतीय संघाने एकही विकेट्स न गमावता १० षटकानंतर ६३ धावा केल्या आहेत. रोहित वेगाने धावा करत आहे. तर, गिल सावधपणे खेळत आहे.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल क्रीजवर
३षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही न गमावता २६ धावा आहे. टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल क्रीझवर आहेत. रोहित शर्मा १३ चेंडूत २१ धावा करून खेळत आहे. तर शुभमन गिल ५ चेंडूत ५ धावा करून नाबाद आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला विजयासाठी २५७ धावांचे लक्ष्य आहे.
रोहित आणि गिल क्रीजवर उपस्थित
भारतीय संघासाठी पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही हिट जोडीने डावाची सुरुवात केली आहे. बांगलादेशने भारताविरुद्ध ८विकेट गमावत २५६ धावा केल्या आहेत. टीम इंडियाने पहिल्याच षटकांत रोहित शर्माच्या बॅटमधून दोन चौकार पाहिला मिळाले.
CWC2023. 1.1: Mustafizur Rahman to Shubman Gill 4 runs, India 12/0 https://t.co/h882jYKkfB #INDvBAN #CWC23
— BCCI (@BCCI) October 19, 2023
तन्जिद हसन (५१), लिटन दासची (६६) अर्धशतकं आणि अखेच्या षटकांमध्ये महमदुल्लाहने (४६) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने निर्धारित ५० षटकांमध्ये ८ बाद २५६ धावांपर्यंत मजल मारली आहे. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवने एकेक गडी बाद केला.
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मुशफकीर रहीमने चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवला. रवींद्र जडेजाने उजवीकडे झेप घेत अफलातून झेल टिपला. काही सेकंद जडेजा हवेत होता. खाली पडताना चेंडूचा स्पर्श जमिनीला होणार नाही याची काळजी घेत जडेजाने झेल पूर्ण केला. अनुभवी मुशफकीरची ३८ धावांची खेळी जडेजाच्या शानदार झेलमुळे संपुष्टात आली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर भारत-बांगलादेश सामन्याला उपस्थित आहे. जायंट स्क्रीनवर सारा दिसताच मैदानातील चाहत्यांनी एकच जल्लोष केला. भारताचा धडाकेबाज सलामीवीर शुबमन गिल आणि सारा यांची जोडी सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. बांगलादेशविरुद्धच्या लढतीला सारा हजर आहे कळताच पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोडीच्या चर्चेला उधाण आलं आहे.
खूप वेळानंतर भारताला पाचवा बळी मिळाला आहे. ३८ व्या षटकात शार्दुल ठाकूरने तौहीद ह्रिदोयला १६ धावांवर बाद केलं. बांगलादेशने ३८ षटकांत ५ बाद १८० धावांपर्यंत मजल मारली आहे.
बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज तनजीद हसनला भारताने जीवदान दिले आहे. बुमराहच्या चेंडूवर तनजीदची विकेट घेण्याची भारताला संधी होती, मात्र एकाही भारतीय खेळाडूने अपील केले नाही. भारतीय खेळाडूंना वाटले की चेंडू आधी बॅटला लागला होता, पण नंतर पाहिले असता चेंडू थेट पॅडला लागला होता. अशा स्थितीत भारताने एक विकेट मिळवण्याची संधी गमावली आहे.
Hardik pandya hurt himself while saving a boundary.#indiavsbangladesh #HardikPandya #INDvsBAN pic.twitter.com/NEuUDx7BTT
— Ahmad (@ahmadjaved_1) October 19, 2023
बांगलादेशच्या डावात ८ षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. बांगलादेशची धावसंख्या ८ षटकांनंतर ३७ धावा आहे. भारतीय गोलंदाजांची अचूक टप्प्यावर गोलंदाजी सुरूच आहे. मात्र, भारत अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहे.
No matter what you say, Rohit Sharma has become new god of cricket and emotion after sachin Tendulkar.
— Prathmesh. (@45Fan_Prathmesh) October 19, 2023
Below posters are perfect examples of it.!#INDvsBAN pic.twitter.com/CjevfBue5f
बांगलादेशने ५ षटकांत १० धावा केल्या
बांगलादेशने ५ षटकांनंतर बिनबाद १० धावा केल्या. तनजीद हसन १६ चेंडूत ९धावा करून खेळत आहे. लिटन दास १ धाव घेऊन खेळत आहे. भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने ३ षटकात ५ धावा दिल्या आणि एक निर्धाव षटक टाकले. सिराजने २ षटकांत ५ धावा दिल्या.
#INDvsBAN
— BOBjr (@superking1816) October 19, 2023
Everyone's favourite Virat Kohli ❤️ pic.twitter.com/MvJLKkmaNu
बांगलादेशकडून तनजीद हसन आणि लिटन दास सलामीला आले आहेत. भारताकडून पहिले षटक जसप्रीत बुमराहने टाकले.
Ritika Sajdeh at the MCA Pune stadium and watching the match.#INDvsBAN pic.twitter.com/wd9jQwADPX
— All About India ??? (@BharatiyaTalks) October 19, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश : लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), नसुम अहमद, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.
Huge ROar from the Crowd for Rohit Sharma!!?#INDvsBAN pic.twitter.com/wrzGPKQ57b
— Prathmesh. (@45Fan_Prathmesh) October 19, 2023
भारत आणि बांगलादेश संघांत एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा १७वा सामना पुण्यात खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्णधार शकीब अल हसन बांगलादेशकडून खेळत नाही. त्याच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे. शाकिब हा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या जागी नजमुल हसन शांतो कर्णधार आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. अशा स्थितीत नाणेफेक हरल्यानंतरही फारसे नुकसान होत नाही. रोहितने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
https://twitter.com/ahsan_vibes01/status/1714915546695881033
भारतीय खेळाडू स्टेडियमवर पोहोचले आहेत. सध्या पुण्यात ऊन आहे. स्टेडियमबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण स्टेडियम भरले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळण्याची चाहत्यांना अपेक्षा आहे.
२६ हजार धावांपासून अवघ्या काही पावले दूर
बांगलादेशविरुद्धचा हा सामना विराट कोहलीसाठी खास असेल. खरंतर विराट एका खास विक्रमाच्या अगदी जवळ आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पाठलाग करणारा मास्टर २६ हजार धावा पूर्ण करण्यापासून अवघ्या काही पावले दूर आहे. २६ हजार धावा पूर्ण करताच विराट श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकेल.
Hello from Pune! ?#TeamIndia are all set to take on Bangladesh in their next game of #CWC23 ??
— BCCI (@BCCI) October 19, 2023
⏰2 PM IST
?https://t.co/Z3MPyeL1t7#MeninBlue | #INDvBAN pic.twitter.com/OqnmDYGkUG
विराट कोहलीला बांगलादेशविरुद्ध फक्त ७७ धावा करायच्या आहेत आणि यासह तो २६ हजार धावा पूर्ण करण्यासाठी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंगच्या यादीत सामील होईल. विराट कोहलीने सध्या २५९२३ धावा पूर्ण केल्या आहेत. तर महेला जयवर्धने २५९५७ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. रिकी पाँटिंग २७४८३ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर कुमार संगकारा २८०१६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर आहे, ज्याने ३४३५७ धावांसह आपल्या क्रिकेट इतिहासात पहिले स्थान पटकावले आहे.
या विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघांनी ३-३ सामने खेळले गेले आहेत, ज्यात एकीकडे भारतीय संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशने तीनपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. दोन सामन्यात त्यांनी पराभव पत्करावा लागला आहे. या विश्वचषकात भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे. बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव सामना जिंकला आहे, तर इंग्लंड आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे.
पुण्यात काल म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी थोडा पाऊस झाला होता, मात्र आज हवामान निरभ्र होणार आहे. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या ३०७ धावांची आहे. या मैदानावर ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४ आणि धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३ सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत आज नाणेफेक जिंकून दोन्ही संघांना प्रथम फलंदाजी करायची आहे. या मैदानावर भारतीय संघाने २०१७ साली इंग्लंडविरुद्धची सर्वात मोठी धावसंख्या केली होती. त्यावेळी टीम इंडियाने ७ विकेट गमावून ३५६ धावा केल्या होत्या.
बांगलादेश संघाला वनडे फॉरमॅटमध्ये कधीही भारताला मायदेशात हरवता आलेले नाही. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत ३ सामने भारतात झाले असून तिन्ही सामने जिंकले आहेत. त्याचबरोब विश्वचषकात दोन्ही संघ चारवेळा आमनेसामने आले आहेत.
२५ डिसेंबर १९९० रोजी दोघांमधील पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला होता. तो सामना भारताने ९ विकेटने जिंकला होता. भारताने १४ मे १९९८ रोजी घरच्या मैदानावर बांगलादेश विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळला आणि ५ गडी राखून जिंकला होता. भारताने २५ मे १९९८ रोजी घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. भारतीय संघाने हा सामना ५ विकेटने जिंकला.
भारत आणि बांगलादेशचे एकमेकांविरुद्धचे रेकॉर्ड –
सर्वोच्च धावसंख्या (भारत) – ५० षटकांत ४०९/८ (चटगाव, २०२२)
सर्वात कमी धावसंख्या (भारत) – २५.३ षटकांत १०५ (मीरपूर, २०१४)
सर्वोच्च धावसंख्या (बांगलादेश) – ४९.४ षटकांत ३०७ (मीरपूर, २०१५)
सर्वात कमी धावसंख्या (बांगलादेश) – १७.४ षटकांत ५८ (मीरपूर, २०१४)
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (भारत) – इशान किशन – २१०* (१३१) (चटगाव, 2022)
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (बांगलादेश) – लिटन दास १२१ (११७) (दुबई, २०१८)
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी (भारत) – स्टुअर्ट बिन्नी –६/४ (मीरपूर, २०१४)
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी (बांगलादेश) – मुस्तफिजुर रहमान – ६/४३ (मीरपूर, २०१५)
CWC 2023 India vs Bangladesh Highlights Score Updates in Marathi: