Asia Cup 2025, IND vs OMAN Highlights in marathi: आशिया चषक २०२५ च्या गट टप्प्यातील अखेरचा सामना भारत आणि ओमान यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने २१ धावांनी ओमानवर विजय मिळवला. तर ओमान संघाने भारतीय संघाविरूद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. यासह आशिया चषक गट टप्प्यातील सर्व सामने संपले असून सुपर फोर सामन्यांना सुरूवात होईल.

Live Updates

India vs Oman Highlights in marathi: आशिया चषकातील भारत आणि ओमान सामन्याचे हायलाईट्स

11:29 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN Live: भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह

11:16 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN Live: भारत वि. ओमान सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IND vs OMAN: दुबई नाही ‘या’ मैदानावर भिडणार भारत-ओमानचे संघ, सामना लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या
11:14 (IST) 19 Sep 2025

Asia Cup IND vs OMAN Live: भारत आणि ओमानमध्ये आज लढत

आशिया चषक २०२५ आता सुपर फोरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघाने सलग दोन्ही सामने जिंकत सुपर फोरमध्ये धडक मारली आहे. आता भारतीय संघ गट टप्प्यातील अखेरचा सामना ओमानविरूद्ध खेळणार आहे.

IND vs OMAN Highlights, 19 September 2025: भारताने आशिया चषक २०२५ मधील गट टप्प्यातील अखेरचा सामन्यात ओमानवर शानदार २१ धावांनी विजय मिळवला.