India vs South Africa 3rd T20 Highlights, 14 December 2023 : जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने १०६ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ७गडी गमावून २०१ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, प्रत्युत्तरात प्रोटीज संघ अवघ्या ९५ धावांत गारद झाला. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियासाठी हा ‘करा या मरो’चा सामना होता. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमार यादवने झटपट शतक झळकावून भारतीय संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यानंतर कुलदीप यादवने ५ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला १०० धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही.

Live Updates

IND vs SA 3rd T20 Highlights : तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियासाठी हा ‘करो या मरो’चा सामना होता. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली.

23:56 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी पराभव केला

भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २०१ धावा केल्या होत्या. यादरम्यान सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. त्याने ५६ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकार ठोकले. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ ९५ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून कुलदीप यादवने ५ गडी बाद केले. रवींद्र जडेजाने २ विकेट घेतल्या. त्याचबरोबर तीन सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.

23:45 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : कुलदीप यादवने पटकावली तिसरी विकेट, दक्षिण आफ्रिकेला दिला आठवा धक्का

दक्षिण आफ्रिकेची आठवी विकेट पडली. बर्गरला कुलदीप यादवने बाद केले. दक्षिण आफ्रिकेने 13.1 षटकात 8 गडी गमावून 94 धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलर 35 धावा करून खेळत आहे. भारताकडून कुलदीपने 3 विकेट्स घेतल्या आहेत.

23:37 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : कुलदीप यादवने फरेरा केले क्लीन बोल्ड

डोनोवन फरेराकडून षटकार घेत पुढच्याच चेंडूवर कुलदीप यादवने विकेट्स विखुरल्या. फरेरा 12 धावा करून क्लीन बोल्ड झाला आणि दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का बसला.

23:35 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का बसला

दक्षिण आफ्रिकेची सहावी विकेट पडली. अँडिले फेहलुकवायो शून्यावर बाद झाला. त्यालाही जडेजाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकेने 11 षटकात 82 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/SameerKhan262/status/1735360083008340188

23:28 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेने ९ षटकांत केल्या ६६ धावा

दक्षिण आफ्रिकेने 9 षटकांत 4 गडी गमावून 66 धावा केल्या. डेव्हिड मिलर 12 चेंडूत 19 धावा करून खेळत आहे. डेनोवन 5 धावा केल्यानंतर खेळत आहे.

23:14 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : रवींद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेला दिला चौथा झटका

दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का बसला

दक्षिण आफ्रिकेची चौथी विकेट पडली. कर्णधार एडन मार्करामला रवींद्र जडेजाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मार्कराम 14 चेंडूत 25 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेने 6.1 षटकांत 4 गडी गमावून 43 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/atifmanzoor105/status/1735354112911524246

23:09 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेला दिला तिसरा झटका

दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट हेन्रिक क्लासेनच्या रूपाने पडली. 5 धावा करून तो बाद झाला. अर्शदीप सिंगने क्लासेनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकेने 5.4 षटकात 3 गडी गमावून 42 धावा केल्या आहेत.

22:58 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का

दक्षिण आफ्रिकेची दुसरी विकेट रीझा हेंड्रिक्सच्या रूपाने पडली. 13 चेंडूत 8 धावा करून तो बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने धावबाद केले. दक्षिण आफ्रिकेने 3.2 षटकात 23 धावा केल्या.

22:57 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : सूर्यकुमार यादवला क्षेत्ररक्षण करताना झाली दुखापत

सूर्यकुमार यादवला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आहे.

22:50 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला

दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट पडली. मॅथ्यू 3 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. मुकेश कुमारने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. संघाने 2 षटकात 1 गडी गमावून 14 धावा केल्या आहेत. आता एडन मार्कराम आणि रीझा फलंदाजी करत आहेत.

22:20 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला २०२ धावांचे लक्ष्य दिले

भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 202 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने 20 षटकात 7 विकेट गमावून 201 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. सूर्याने 55 चेंडूचा सामना करताना 7 चौकार आणि 8 षटकांराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथे शतक आहे. तसेच यशस्वी 41 चेंडूत 60 धावा करून बाद झाला.

22:10 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : सूर्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथे शतक झळकावले

सूर्याने ५५ चेंडूचा सामना करताना ७ चौकार आणि ८ षटकांराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथे शतक आहे.

21:54 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : भारताने १६ षटकात केल्या १६१ धावा

भारताने 16 षटकांत 3 गडी गमावून 161 धावा केल्या. सूर्या 83 धावा करून खेळत आहे. रिंकू सिंग 2 धावा करून क्रीजवर उभा आहे. सूर्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने 8 षटकार आणि 4 चौकार मारले आहेत.

21:48 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : टीम इंडियाला तिसरा धक्का, यशस्वी जैस्वाल झाला बाद

भारताची तिसरी विकेट पडली. यशस्वी 41 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. शम्सीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने 14 षटकांनंतर 3 गडी गमावून 141 धावा केल्या आहेत. सूर्या ६५ धावा करून खेळत आहे.

21:39 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : यशस्वी-सूर्या यांनी पूर्ण केली शतकी भागीदारी

सूर्या आणि यशस्वीने भारतासाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. भारताने 13 षटकांनंतर 2 गडी गमावून 131 धावा केल्या आहेत. यशस्वी 58 धावा करून खेळत आहे. सूर्या 57 धावा करून खेळत आहे. या दोघांमध्ये 102 धावांची भागीदारी आहे.

21:32 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : यशस्वी जैस्वालने झळकावले वादळी अर्धशतक, टीम इंडियाने ओलांडला शतकाचा टप्पा

यशस्वी जैस्वालने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. तो 35 चेंडूत 50 धावा केल्यानंतर खेळत आहे. सूर्याने 35 धावा केल्या आहेत. भारताच्या धावसंख्येने 100 धावांचा टप्पा गाठला आहे.

21:27 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : सूर्या-यशस्वी यांनी भारतासाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली

भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव चांगली फलंदाजी करत आहेत. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आहे. यशस्वी ४६ धावा करून खेळत आहे. सूर्याने २६ धावा केल्या आहेत. भारताने १० षटकांनंतर २ गडी गमावून ८७ धावा केल्या आहेत.

21:22 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : सूर्या-यशस्वीने सावरला टीम इंडियाचा डाव

भारतीय संघाला सुरुवातीचे दोन धक्के बसले असले, तरी धावगती कमी झाली नाही. टीम इंडियाने अवघ्या ९ षटकांत धावसंख्या ८२ धावांच्या पुढे नेली आहे. सूर्या २३ चेंडूत २५ धावा करून खेळत आहे. यशस्वी २७ चेंडूत ४४ धावा करून खेळत आहे.

21:19 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : सूर्या-यशस्वीने सावरला टीम इंडियाचा डाव

भारतीय संघाला सुरुवातीचे दोन धक्के बसले असले,तरी धावगती कमी झाली नाही. टीम इंडियाने अवघ्या ९ षटकांत धावसंख्या ८२ धावांच्या पुढे नेली आहे. सूर्या २३ चेंडूत २५ धावा करून खेळत आहे. यशस्वी २७ चेंडूत ४४ धावा करून खेळत आहे.

21:07 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : टीम इंडियाचे अर्धशतक पूर्ण

भारतीय संघाला सुरुवातीचे दोन धक्के बसले असले,तरी धावगती कमी झाली नाही. सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी करत अवघ्या ६ षटकांत धावसंख्या ६२ धावांच्या पुढे नेली आहे. सूर्या १२ चेंडूत १९ धावा करून खेळत आहे. यशस्वी १८ चेंडूत २८ धावा करून खेळत आहे. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले आहेत.

20:53 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : शुबमन गिलनंतर तिलक वर्मा शून्यावर बाद

भारताची दुसरी विकेट तिलक वर्माच्या रूपाने पडली. तो शून्यावर बाद झाला. केशव महाराजाने तिलकला बाद केले. भारताने ३ षटकांनंतर २ गडी गमावून ३० धावा केल्या. यशस्वी १५ धावा करून खेळत आहे. सूर्या १ धाव घेतल्यानंतर खेळत आहे. तत्पूर्वी शुबमन गिल बाद झाला.

20:53 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : भारताची वेगवान सुरुवात

शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली आहे. पहिल्याच षटकात गिलने स्फोटक फटके मारत १५ धावा जोडल्या.

20:14 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारताची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, एंडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी, नांद्रे बर्गर.

20:12 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आहे. संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

19:54 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : दुसऱ्या टी-२०मध्ये भारतीय गोलंदाजांनी केले होते निराश

गकेबरहा येथील सेंट जॉर्जेस पार्क स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांची दयनीय कामगिरी झाली. अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकले नाहीत. दोघांनी १५.५० आणि ११. ३० धावा प्रति षटकाच्या इकॉनॉमीने धावा दिल्या. वडिलांची तब्येत खराब असल्याने दीपक चहर संघात सामील नव्हता.

19:42 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : सर्वांच्या नजरा रिंकू सिंगवर असतील

टीम इंडियाला रिंकू सिंगच्या रुपाने एक उत्तम फिनिशर मिळाला आहे. ११ सामन्यांच्या ७ डावात या डावखुऱ्या फलंदाजाने ८२.६७.च्या सरासरीने २४८ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १८३.७ आहे. रिंकूने गेल्या सामन्यात त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले होते.

19:14 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : भारताने जोहान्सबर्गमध्येच टी-२० पदार्पण केले होते

भारताने जोहान्सबर्गमध्येच टी-२० पदार्पण केले

भारताने पहिला टी-२० सामना जोहान्सबर्ग येथे खेळला होता. २००६ मध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून पराभव केला होता. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग कर्णधार होता. दिनेश कार्तिक हा सामनावीर ठरला. सध्याचा मुख्य निवडकर्ता अजित आगरकरही हा सामना खेळला होता.

19:02 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : यानसेन आणि कोएत्झी तिसरा

यानसेन आणि कोएत्झी खेळणार नाहीत

भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मार्को जॅनसेन आणि जेराल्ड कोएत्झी खेळताना दिसणार नाही. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी दोघांची शेवटच्या टी-२०मध्ये निवड झालेली नाही. कोएत्झीने दुसऱ्या टी-२० मध्ये ३ विकेट घेतल्या. यानसेनने १ बळी घेतला. त्याने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.

18:39 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिका आठ वर्षांनंतर भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकणार का?

टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. २०१५ पासून दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकलेली नाही. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा त्यांच्याच भूमीवर २-० असा पराभव केला होता. आता टीम इंडियाला मालिका गमावण्याचा धोका आहे.

18:22 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : सलामीच्या जोडीला करावी लागेल चांगली सुरुवात

सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांना दुसऱ्या सामन्यात खेळपट्टीच्या उसळीशी जुळवून घेता आले नाही. दोन्ही फलंदाज खाते न उघडताच बाद झाले. भारताला मालिकेत बरोबरी साधायची असेल, तर सलामीच्या जोडीने चालने आवश्यक आहे. ऋतुराज गायकवाड आजारी आहेत. जर तो ठीक असेल तर त्याला ओपनिंगमध्ये संधी दिली जाऊ शकते. याशिवाय जितेशच्या जागी इशान किशन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळू शकतो. त्याचबरोबर तिलकच्या जागी श्रेयस अय्यरला तर कुलदीपच्या जागी रवी बिश्नोईला संधी दिली जाऊ शकते.

IND vs SA 3rd T20 Highlights : तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियासाठी हा 'करा या मरो'चा सामना होता. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना १०६ धावांनी जिंकून भारतीय संघाने मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.