India vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Live Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या ३३व्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला आहे. भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सलग सातवा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने ३५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १९.४ षटकांत ५५ धावांवर गारद झाला.
CWC 2023 India vs Sri Lanka Highlights in Marathi: भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सलग सातवा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक १००० धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने सात वेळा हा पराक्रम केला आहे. याशिवाय विराट कोहलीने एका कॅलेंडर वर्षात सात वेळा एक हजारहून अधिक धावा केल्या आहेत. आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची सुवर्णसंधी आहे. या वर्षी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९६६ धावा केल्या आहेत.
आशिया कप २०२२ नंतर विराटने हरवलेला फॉर्म परत मिळवला आहे. त्याआधी विराट सुमारे अडीच वर्षे सतत फ्लॉप होत होता आणि एकही शतक त्याला झळकावता आले नाही, पण आता विराटच्या बॅट चांगली तळपत आहे. तो प्रत्येक सामन्यात धावा करत आहे. आज विराट कोहलीने ३४ धावा केल्या तर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात आठ वेळा १००० धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज बनेल.
एकदिवसीय विश्वचषकात या दोघांमध्ये झालेल्या नऊ सामन्यांपैकी चार सामने भारताने तर चार सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. या दोघांमध्ये भारतीय भूमीवर तीन विश्वचषक सामने खेळले गेले आहेत. यापैकी श्रीलंकेने दोन सामने जिंकले, तर भारताने एक सामना जिंकला. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील तीन सामन्यांपैकी भारताने दोन जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. आजपर्यंत भारताला टी-२० विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही.
हवामान अहवाल
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मुंबईत आज हवामान निरभ्र असेल, पावसाची शक्यता नाही. याशिवाय तापमान २६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. त्याचबरोबर वाढते प्रदूषण पाहता या सामन्यात फटाक्यांची आतषबाजी किंवा रोषणाईचा कार्यक्रम दिसणार नाही. याबाबत बीसीसीआयने आधीच माहिती दिली आहे. मुंबई शहरातील खराब हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
T 4817 – Most credible .. ? pic.twitter.com/IBNdPOcJJZ
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 1, 2023
आयसीसी टूर्नामेंटमधील दोन्ही संघांच्या विक्रमांबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघ एकूण १४ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, एकदिवसीय विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक यांचा समावेश आहे. दोन्ही संघ पहिल्यांदा १९७९ मध्ये आयसीसी स्पर्धेत भिडले होते. मँचेस्टर येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने भारताचा ४७ धावांनी पराभव केला होता. आयसीसी स्पर्धेत भारताचा श्रीलंकेविरुद्ध खराब रेकॉर्ड आहे. श्रीलंकेने १४ पैकी सात सामने जिंकले आहेत, तर भारताने पाच जिंकले आहेत. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही.
Caption this ??#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvSRI pic.twitter.com/DzWXwbxYVR
— BCCI (@BCCI) November 1, 2023
भारत आणि श्रीलंका संघातील सामन्याला दुपारी २ पासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी १:३० वाजता या सामन्याची नाणेफेक पार पडेल.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
श्रीलंका : कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, दुष्मंथा चमीरा, दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, महिश तिक्षाना, दुनिथ वेलालगे, कसून राजिथा, अँजेलो मॅथ्यूज, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने.
An update from India's captain on a potential #CWC23 return for star all-rounder Hardik Pandya ?
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 2, 2023
Details ?https://t.co/4u1wBDs0Tj