IND vs WI Highlights: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिजचा डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. तर पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने २ गडी बाद १२१ धावा केल्या. केएल राहुल आणि शुबमन गिलची जोडी नाबाद परतली होती. दरम्यान दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाकडून दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना केएल राहुलने १००, शुबमन गिलने ५०, ध्रुव जुरेलने १२५ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा १०४ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ५ गडी बाद ४४८ धावा केल्या आहेत. यासह पहिल्या डावात २८६ धावांची आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाच्या १५० धावा पूर्ण
भारतीय संघाने या डावातील पहिल्या डावात फलंदाजी करताना १५० धावांचा पल्ला गाठला आहे. केएल राहुल ७० धावांवर नाबाद आहे. तर शुबमन गिलने नाबाद ३३ धावांची खेळी केली आहे.
अर्धशतक झळकावताच गिल बाद
इंग्लंड दौऱ्यावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या कर्णधार शुबमन गिलने वेस्टइंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्यातही दमदार अर्धशतकी खेळी केली. गिलने ९४ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण चेसच्या गोलंदाजीवर नको तो फटका मारण्याच्या नादात तो १०० चेंडू खेळून ५० धावा करत माघारी परतला. भारतीय संघाने ३ गडी बाद १८८ धावा केल्या आहेत.
केएल राहुलचं शतक पूर्ण
केएल राहुलने पहिल्या दिवशी फलंदाजी करताना आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. आता दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना पहिल्याच सत्रात त्याने १९० चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक आहे. तर मायदेशातील हे त्याचे केवळ दुसरे शतक ठरले आहे. २०१६ मध्ये इंग्लंडविरूद्ध शतक झळकावलं होतं. आता ९ वर्षांनंतर त्याने मायदेशात शतक झळकावलं आहे.
केएल राहुल परतला माघारी
केएल राहुलने दुसऱ्या दिवसातील पहिल्याच सत्रात दमदार सुरूवात करन दिली. त्याने १९० चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. दरम्यान कव्हरच्या दिशेने फटका मारत असताना केएल राहुल १०० धावा करत माघारी परतला.
भारतीय संघाकडे १०० धावांची आघाडी
या सामन्यातील पहिल्या डावात वेस्टइंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७८ व्या षटकात २६२ धावा करून १०० धावांची आघाडी घेतली आहे.
ध्रुव जुरेलचं अर्धशतक
९१ ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर ध्रुव जुरेलला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. या संधीचा फायदा घेत त्याने ९१ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
रवींद्र जडेजाचं अर्धशतक! टीम इंडियाकडे मोठी आघाडी
पहिल्या डावात फलंदाजी करताना रवींद्र जडेजाने देखील आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आहे. रवींद्र जडेजा ५० तर ध्रुव जुरेल ६८ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात १६४ धावांची आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाची आघाडी २०० पार! ध्रुव जुरेलकडे शतक झळकावण्याची संधी
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने २०० धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने १११ व्या षटकापर्यंत ३६३ धावा केल्या आहेत. ध्रुव जुरेल ८८ धावांवर नाबाद आहे. तर रवींद्र जडेजा ६८ धावांवर नाबाद आहे.
ध्रुव जुरेलनंतर रवींद्र जडेजाचं दमदार शतक! भारतीय संघाकडे मोठी आघाडी
या सामन्यात फलंदाजी करताना आधी ध्रुव जुरेलने आपलं शतक पूर्ण केलं. तो १२५ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजाने देखील आपलं शतक पूर्ण केलं. भारतीय संघाने २८० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.