भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. शुक्रवारी (२३ सप्टेंबर) टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधण्यासाठी या मैदानावर उतरणार आहे. पहिल्या सामन्यात त्यांना चार गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघाने हा सामना जिंकला नाही तर मालिका गमवावी लागेल. या मैदानावरील भारताचा विक्रम पाहता, गेल्या सहा वर्षांपासून तो येथे हरलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघ पाचव्यांदा टी२० सामना खेळण्यासाठी नागपुरात उतरणार आहे. १० नोव्हेंबर २०१९ रोजी ते बांगलादेशविरुद्ध येथे शेवटचा सामना खेळले होते. त्यानंतर तो सामना ३० धावांनी जिंकला. नागपुरात आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये भारतीय संघाने दोन जिंकले आहेत. त्याचवेळी त्यांना दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. ते येथे प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

हेही वाचा   :  IND VS AUS 3rd T20: हैदराबादमध्ये क्रिकेट चाहत्यांना सांभाळणे कठीण, तिकिटांसाठी चेंगराचेंगरी, पोलिसांचा लाठीमार

शेवटचा पराभव २०१६ मध्ये नागपुरात झाला होता

१५ मार्च २०१६ रोजी नागपुरात भारताचा शेवटचा पराभव झाला होता. त्यावेळेस टी२० विश्वचषकातील सुपर-१० सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने सात गड्यांच्या मोबदल्यात १२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ १८.१ षटकांत ७९ धावांत गारद झाला. महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता. त्या पराभवानंतर भारताने येथे एकही सामना गमावलेला नाही.

भारतीय संघाची नागपुरातील कामगिरी

९ डिसेंबर २००९ श्रीलंकेकडून भारताचा २९ धावांनी पराभव झाला

१५ मार्च २०१६ न्यूझीलंडकडून भारताचा ४७ धावांनी पराभव झाला

२९ जानेवारी २०१७ इंग्लंडवर भारताचा ५ धावांनी विजय

१० नोव्हेंबर २०१९ बांगलादेशवर भारताचा ३० धावांनी विजय

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India will play t20 against australia for the first time in nagpur team india has not lost at this ground for six years avw