बंगळुरूमध्ये आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन यशस्वीरित्या पार पडले. काल आणि आज झालेल्या या महालिलावात अनेक खेळाडूंचे नशीब उघडले, तर काहींना अजून या श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज इशान किशन (१५.२५) या लीगचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने ११.५० कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाला संघात घेण्यात चेन्नईने रस दाखवला नाही. आता अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन सघांची एन्ट्री झाल्यामुळे चाहत्यांना लीगच्या प्रारंभाची उत्सुकता लागली आहे.
तन्मय अगरवाल अनसोल्ड
संदीप वॉरियर अनसोल्ड
अंड्र्यू टाय अनसोल्ड
रॉस टॉप्ली अनसोल्ड
चेन्नईने मिल्नसाठी १.९० कोटींची बोली लावली.
मुंबईने मिल्ससाठी १.५० कोटी मोजले.
राजस्थानने मकॉयला ७५ लाखांत संघात घेतले.
सिद्धार्थ कौल अनसोल्ड
फझल हक फारुखी अनसोल्ड
नॅथन एलिस अनसोल्ड
जेसन बेहरनडॉर्फसाठी आरसीबीने ७५ लाख मोजले.
ग्लेन फिलिप्स अनसोल्ड
बेन मॅक्डरमॉट अनसोल्ड
रहमानुल्लाह गुरबाझ अनसोल्ड
अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्डसाठी मुंबई, हैदराबाद, राजस्थान, चेन्नईने बोली लावली. हैदराबादने त्याला ७.७५ कोटींची बोली लावत संघात दाखल केले.
सँटनरसाठी चेन्नईने १.९० कोटी मोजले.
डॅनियल सॅम्ससाठी मुंबईने २.६० कोटी मोजले.
आरसीबीने रुदरफोर्डला १ कोटींमध्ये संघात घेतले.
चेन्नईने ड्वेन प्रिटोरियसला संघात घेतले.
जॉर्ज गार्टन अनसोल्ड
पंजाब किंग्जने ५५ लाखांत ऋषी धवनला संघात घेतले.
चरिथ असलांका अनसोल्ड
इंग्लंडचा तेजतर्रार गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी राजस्थान आणि मुंबईने शर्यत लावली. त्यानंतर हैदराबादनेही रस दाखवला. पण मुंबईने त्याला ८ कोटींमध्ये संघात घेतले.
.@JofraArcher joins the Paltan! ? ?@mipaltan bring the England cricketer on board for INR 8 Crore. ? ? pic.twitter.com/9wm0XuxVs6
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
रूसी वॅन डर डुसेन अनसोल्ड
लखनऊ, चेन्नई आणि दिल्लीने पॉवेलसाठी बोली लावली. दिल्लीने पॉवेलला २.८० कोटींमध्ये संघात घेतले.
करुण नायर अनसोल्ड
विंडीजचा डावखुरा फलंदाज लुईस अनसोल्ड ठरला.
इंग्लंडचा सलामीवीर हेल्ससाठी कोणीही रस दाखवला नाही.
चेन्नईने कॉन्वेसाठी १ कोटी मोजले.
आरसीबीने एलनला ८० लाखांत संघात घेतले.
