जगातील श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस पार पडला. पहिल्या दिवशी ईशान किशन, दीपक चहर, आवेश खान, राहुल तेवतिया, राहुल त्रिपाठी, राहुल चहर, शार्दुल ठाकूर यांच्यावर पैशांचा पाऊस पडला आहे. आत्तापर्यंत झालेल्या लिलाव प्रक्रियेत भारतीय खेळाडूंटा वरचष्मा पाहायला मिळाला. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत.
पहिल्या दिवशी ९७ खेळाडूंवर बोली लागली. ७४ खेळाडूंना संघात स्थान मिळाले, तर २३ खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. ईशान किशनला (१५.२५) सर्वाधिक रक्कम मिळाली, तर आवेश खान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरसाठी दिल्ली आणि हैदराबादने बोली लावली. त्यानंतर चेन्नई आणि राजस्थानही शर्यतीत उतरले. चेन्नईने १४ कोटी देत दीपकला आपल्या संघात घेतले.
डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नजराजनसाठी हैदराबादने ४ कोटी मोजले.
विंडीजचा धाकड फलंदाज निकोलस पूरनसाठी सीएसके, केकेआर आणि हैदराबादचे बोली लावली. शेवटी हैदराबादने १०.७५ कोटी देत पूरनला आपल्या ताफ्यात सामील केले.
सॅम बिलिंग्ज अनसोल्ड राहिला
यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा अनसोल्ड राहिला.
भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी आरसीबी आणि चेन्नईने बोली लावली. आरसीबीने त्याला ५.५० कोटी देत संघात सामील करून घेतले.
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोला ६.७५ कोटी देत पंजाब किंग्जने संघात सामील करून घेतले.
सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने सुरुवातीला बोली लावली. मुंबईला पंजाब किंग्जकडून टक्कर मिळाली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनेही इशानसाठी रस दाखवला. पण मुंबईने १५.२५ कोटी देत इशानला संघात पुम्हा सामील करून घेतले.
अनुभवी खेळाडू अंबाती रायुडूसाठी चेन्नईने बोली लावली. सीएसकेने त्याला ६.७५ कोटींची बोली लावत संघात घेतले.
अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी अनसोल्ड राहिला.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शसाठी दिल्ली कॅपिटल्सने ६.५० कोटी मोजले.
अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला लखनऊने ८.२५ कोटींच्या किमतीसह संघात दाखल करून घेतले.
सुंदरची बेस प्राइजसाठी दीड कोटी होती. गुजरातने त्याच्यासाठी बोली लावली. शेवटी सनराजझर्स हैदराबादने त्याला ८.७५ कोटींसह आपल्या संघात सामील करून घेतले.
हसरंगासाठी १०.७५ कोटींपासून पुन्हा बोली सुरू करण्यात आली. आरसीबीने हसरंगाला याच किमतीत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
ह्यूज एडमीड्स यांच्या प्रकृतीमुळे चारू शर्मा हे पुढील ऑक्शनर म्हणून उर्वरित काम पाहणार आहेत.
ह्यूज एडमीड्स यांच्या प्रकृतीबाबत अपडेट आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे समोर आले आहे.
वानिंदू हसरंगाची बोली १०.७५ कोटींवर पोहोचली होती.
श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगासाठी बोली लावली जात असताना ऑक्शनर ह्यूज एडमीड्स (hugh edmeades)अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळे ऑक्शन थांबवण्यात आले आहे. लंचची घोषणा करण्यात आली असून एडमीड्स यांच्या प्रकृतीबाबत थोड्याच वेळात अपडेत देण्यात येईल.
नुकताच भारतासाठी खेळलेला अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डासाठी लखनऊ संघाने ५.७५ कोटींची बोली लावत संघात घेतले.
मागील हंगामात फॉर्मात असलेला वेगवान गोलंदाज हर्षल पटेलसाठी आरसीबी, सीएसकेने बोली लावली. शेवटी आरसीबीने १०.७५ कोटींमध्ये त्याला संघात घेतले.
शाकिब आज अनसोल्ड ठरला.
अष्टपैलू खेळाडू होल्डरला ८.७५ कोटींची बोली लागली. लखनऊ संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले.
डावखुरा फलंदाज नितीश राणासाठी सुरुवातीला आरसीबीने बोली लावली. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि केकेआरने जोर धरला. ८ कोटी देत केकेआरने त्याला संघात घेतले.
अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होसाठी चेन्नई सुपर किंग्जने बोली उघडली. ४.४० कोटी देत सीएसकेने त्याला संघात घेतले.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्मिथ अनसोल्ड राहिला.
सुरेश रैना आज अनसोल्ड राहिला.
सलामीवीर फलंदाज देवदत्तसाठी आरसीबी आणि सीएसकेने रस दाखवला. शेवटी राजस्थान रॉयल्सने ७.७५ कोटी देत राजस्थानने संघात घेतले आहे.