Hardik Pandya Shouted At Bumrah Video Viral MI vs KKR: शुक्रवारी झालेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा २४ धावांनी लाजिरवाणा पराभव केला. यंदाच्या आयपीएल हंगामातील ११ पैकी ८ सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार हार्दिक पांड्या स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर ओरडताना दिसला. जसप्रीत बुमराहसोबत हार्दिक पांड्याचं असं वागणं पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुमराहवर भडकला हार्दिक पंड्या

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या १७व्या षटकात ही घटना घडली. यावेळी मुंबई इंडियन्सचा (एमआय) कर्णधार हार्दिक पंड्या स्वत: गोलंदाजी करत होता. हार्दिक पांड्याने ३० यार्डच्या वर्तुळात क्षेत्ररक्षण करणाऱ्या जसप्रीत बुमराहला मागे जाण्यासाठी सांगितले, बुमराह मागे जात होताच की तितक्यात हार्दिक पांड्या अचानक त्याच्यावर ओरडला आणि लवकर मागे जा असे सांगू लागला. हार्दिक पंड्याच्या या वागण्याने दुखावलेल्या जसप्रीत बुमराहने चेहऱ्यावर हलकसं हसू आणत आपली निराशा लपवली. हा व्हीडिओ पाहून पंड्या पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

१७व्या षटकातच पंड्याची चांगली धुलाई झाली. पंड्याने या सामन्यात दोन विकेट्स घेतले खरे पण ४४ धावाही दिल्या. यानंतर सामन्यातील त्याच्या काही चुकीच्या निर्णयांचा फटकाही संघाला बसला. फलंदाजीसाठी आलेला पंड्या १ धाव करत स्वस्तात बाद झाला.

हार्दिक पांड्या त्याच्या वागण्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चर्चेत राहिला आहे. आयपीएल 2024 च्या सुरुवातीला रोहित शर्माला क्षेत्ररक्षणासाठी सतत इकडून तिकडे पळवताना दिसला होता. गेल्या मोसमात गुजरात टायटन्सच्या कर्णधार असताना हार्दिकने मोहम्मद शमीला झेल सोडल्याबद्दल खूप सुनावले होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya shouted on jasprit bumrah during fielding mi vs kkr video viral ipl 2024 bdg
First published on: 04-05-2024 at 20:09 IST