Suryakumar Yadav fined for slow over-rate: आयपीएल २०२३ मधील २२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रविवारी खेळला गेला. या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणा आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हृतिक शौकीन यांच्यात जोरदार वादावादी झाली. हा वाद दोघांना चांगलाच महागात पडला आहे. कारण दोघांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात दंड ठोठावण्यात आला. सूर्याला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीश राणा आणि हृतिक शौकीनला वाद घालणे पडले महागात –

पहिल्या डावाच्या नवव्या षटकात हृतिक शौकीन आणि नितीश राणा एकमेकांशी भिडले. यासाठी दोघांनाही दंड ठोठावण्यात आला. दोघांमधील भांडणामुळे केकेआरचा कर्णधार नितीश राणाला मॅच फीच्या २५ टक्के, तर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हृतिक शोकीनला मॅच फीच्या १० टक्के दंड आकारण्यात आला आहे. आयपीएलने नितीश राणा आणि हृतिक शौकीन यांच्याबद्दल मीडिया अॅडव्हायझरी जारी केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘केकेआरचा कर्णधार नितीश राणा याने वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल मॅच फीच्या २५ टक्के दंड आकारला आहे. राणाने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२१ अंतर्गत लेव्हल १ गुन्ह्याची कबुली दिली आहे.’

मीडिया अॅडव्हायझरीमध्ये हृतिक शौकीनबद्दल म्हटले आहे की, ‘मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हृतिक शौकीनला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. शौकीनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा कबूल केला आहे.’

हेही वाचा – MI vs KKR: अर्जुनचे आयपीएल ‘पदार्पण’ सचिनसारखेच, सारा तेंडुलकरने शेअर केला १४ वर्षांनंतरचा ‘तो’ अजब योगायोग

पदार्पणाच्या सामन्यात सूर्यकुमार यादवलाही ठोठावला दंड –

सूर्याबाबत, आयपीएलने एक मीडिया अॅडव्हायझरी जारी करताना म्हटले, ‘मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादवला केकेआर विरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर-रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.अॅडव्हायझरीमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘सूर्यकुमार यादववर आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत सीझनमधील पहिला गुन्हा होता, त्यामुळे सूर्यकुमार यादवला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.’

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik shoukin nitish rana and suryakumar yadav have been fined in the 22nd match of ipl 2023 vbm