Fans Abused Shubman Gill on social media: काल रात्री शुबमन गिलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. वास्तविक, आयपीएल २०२३च्या शेवटच्या लीग सामन्यापूर्वी मुंबईने हैदराबादचा पराभव केला होता. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरूला गुजरातविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता, पण ते तसे करू शकले नाहीत आणि स्पर्धेतून बाहेर पडले.
आरसीबीविरुद्ध गुजरातच्या विजयाचा हिरो होता शुबमन गिल. गिलने अवघ्या ५२ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १०४ धावांची खेळी करत विराट कोहलीचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आरसीबीच्या या पराभवानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुबमन गिलला ट्रोल केले.
सामन्यात काय झाले?
गुजरात विरुद्धच्या सामन्यात केवळ विजयच बंगळुरूला प्ले ऑफमध्ये घेऊन जाणार होता. स्टार विराट कोहली याने आपला दमदार फॉर्म कायम राखत, सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. विजयासाठी मिळालेले १९८ धावांचे आव्हान गिलने नाबाद शतक पूर्ण करत अगदी सहजतेने गाठून दिले. त्यामुळे आरसीबीच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
वरिष्ठ खेळाडूंनी आपली जबाबदारी चोख पार पाडली असली तरी, युवा खेळाडूंकडून त्यांना योग्य साथ मिळाली नाही. मागील हंगामात फिनिशरची भूमिका बजावलेल्या दिनेश कार्तिकला यावेळी पूर्णतः अपयश आले. गोलंदाजी विभागात हसरंगा, वैशाक विजयकुमार व वेन पार्नेल हे सातत्यपूर्ण कामगिरी करू शकले नाहीत. तर युवा अनुज रावत, महिपाल लोमरोर व सुरेश प्रभूदेसाई यांनी सपशेल निराशा केली.
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १९७ धावा केल्या होत्या. बंगळुरूकडून विराट कोहलीने ६१ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. यादरम्यान त्याने १३ चौकार आणि एक षटकार मारला. त्याचवेळी फॅफने १९ चेंडूत २८ धावा केल्या. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल ११, दिनेश कार्तिक ०० आणि महिपाल लोमरर एक धावा काढून बाद झाले. प्रत्युत्तरात शुबमन गिलने ५२ चेंडूत १०४ धावांची शानदार सामना विजयी खेळी खेळत संघाला सामना जिंकवून दिला. यादरम्यान गिलने ५ चौकार आणि ८ षटकार मारले. याशिवाय विजय शंकरने ३५ चेंडूत ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शंकरने ७ चौकार आणि २ षटकार मारले.