अर्जुन तेंडुलकरला अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून तो बेंचवर बसला आहे आणि आता इम्पॅक्ट खेळाडू म्हणूनही त्याला पदार्पण करता आलेले नाही. मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन पुन्हा एकदा पदार्पण करू शकला नाही, परंतु तो स्टँडमध्ये पंच म्हणून दिसला. त्याचा हा भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात समावेश केला होता. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने त्याला गेल्या दोन वर्षांपासून संघात खेळण्याची संधी दिली नाही. दरम्यान, ११ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण, दरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकरने पंच टिळक वर्मा यांच्याकडून एकही फटका न मारता षटकार ठोकण्याचा इशारा दिला. हा षटकार होता की चौकार हे स्पष्ट होत नव्हते. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्ही याचा अंदाज लावू शकता.

अर्जुन तेंडुलकरने स्वत: षटकाराचे संकेत दिले

इशान किशन धावबाद झाल्यानंतर तिलक वर्मा खेळपट्टीवर फलंदाजीला आला. मैदानात येताच तो आपल्या शांत खेळीने संघाच्या विजयाचा पाया रचण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तिलक वर्मा कर्णधार रोहित शर्माला सपोर्ट करत होते. तेव्हाच त्याने असा षटकार मारला ज्यावर तो चौकार आहे की षटकार आहे अशी शंका आली. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरनेच पंचाशी न बोलता सहा धावा करण्याचा इशारा दिला. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अर्जुन तेंडुलकरने पंचाने सांगण्याआधी षटकार दिला

खरं तर, दुसऱ्या डावातील १०वे षटक सुरू होते, त्यादरम्यान चेंडू चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या हातात होती. त्यानंतर ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माने लेग साइडच्या दिशेने शॉट खेळला. ज्यावर त्याने षटकार ठोकला. या षटकारावर पंचांची शंका होती की हा ६ आहे की ४. त्यामुळे खुद्द अर्जुन तेंडुलकरने इशारा करून षटकार दिला. ज्याचा तुम्ही हा व्हिडिओ पाहून अंदाज लावू शकता.

हेही वाचा: IPL 2023 CSK vs RR: जॉस द बॉस! बटलरच्या धडाकेबाज खेळीने राजस्थानचे चेन्नईसमोर १७६ धावांचे आव्हान

सराव करताना दिसला अर्जुन तेंडूलकर

या सामन्यापूर्वी अर्जुन मैदानात गोलंदाजीचा सराव करताना दिसला होता, त्यानंतर अर्जुन एमआयसाठी या सामन्यात पदार्पण करू शकतो अशी अटकळ सुरू झाली होती, परंतु एमआयने त्याला एकही षटक दिलेला नाही. मुंबईने २०२१ मध्ये अर्जुनला प्रथमच आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते, परंतु तेव्हापासून त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 arjun tendulkar became umpire made the job easier mumbai won by six wickets avw