IPL 2023 LSG vs CSK: आयपीएल २०२३ मधील सहावा सामना चेन्नईत खेळला जात आहे. चेपॉक स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आमनेसामने आहेत. सीएसके संघाने २०१९ नंतर प्रथमच घरच्या मैदानावर उतरताना एलएसजीला २१८ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी मोलाचे योगदान दिले. चेन्नईने २० षटकांत ७ बाद २१७ धावा केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी –

सीएसकेच्या संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. सीएसकेच्या डावाची सुरुवात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे केली. दोघांनी आपल्या संघाला शानदार सुरुवात करुन दिली. या सलामी जोडीने पहिल्या गड्यासाठी ११० धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाड ५७ धावांवर बाद झाला. त्याने ३१ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि ४ षटकार लगावले.

धोनीच्या पाच हजार धावा पूर्ण –

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर डेव्हॉन कॉनवे संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देखील त्याच्या पाठोपाठ बाद झाला. कॉनवेचे अवघ्या तीन धावांनी अर्धशतक हुकले. त्याने २९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४७ धावांचे योगदान दिले. त्यानंतर मोईन अली (१९), शिवम दुबे (२७), अंबाती रायुडू (२६), बेन स्टोक्स (९) बाद झाले. त्यानंतर आलेल्या धोनीने सलग दोन षटकार मारत आपल्या पाच हजार धावांचा टप्पा पार केला. धोनी आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा करणारा सातवा खेळाडू ठरला आहे.

रवी बिश्नोई घेतल्या सर्वाधिक विकेट्स –

धोनीचा स्ट्राईक रेट ४०० चा होता. बेन स्टोक्स आठ आणि रवींद्र जडेजाने तीन धावा करून बाद झाले. मिचेल सँटनर एक धाव घेत नाबाद राहिला. मार्क वुड आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. आवेश खानला एक बळी मिळाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, मार्क वुड, रवी बिश्नोई, यश ठाकूर, आवेश खान.

चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर) शिवम दुबे, मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगेरगेकर.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 csk vs lsg match update csk have given lsg a target of 218 runs vbm