IPL 2023 GT vs CSK: आयपीएल उद्घाटन सोहळा आणि चेन्नई-गुजरात सामना कधी-कुठे होणार? जाणून घ्या

IPL 2023 Opening Ceremony: आयपीएलच्या १६व्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्याला उद्या संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि अरिजित सिंगसारखे अनेक बॉलीवूड स्टार परफॉर्म करणार आहेत.

IPL 2023 Opening Ceremony and GT vs CSK match
आयपीएल 2023चा उद्घाटन सोहळा आणि जीटी विरुद्ध सीएसके (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

IPL 2023 GT vs CSK Date Time and Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चारवेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पहिल्याच सामन्यात युवा कर्णधार हार्दिक पंड्या अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोर असेल. या सामन्याला रात्री साडेसातला सुरुवात होईल. या अगोदर आयपीएलचा उद्घाटन सोहळा पार पडेल.

धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नईला चार वेळा चॅम्पियन बनवले आहे. त्याचवेळी हार्दिकने पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत गेल्या वर्षी गुजरातला चॅम्पियन बनवले होते. सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा होणार आहे. या दरम्यान अनेक बॉलीवूड स्टार्स ग्लॅमरची भर घालतील. आयपीएलने पुष्टी केली आहे, की गायक अरिजित सिंग आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया या कार्यक्रमात दिसणार आहेत.

आयपीएलने बुधवारी (२९ मार्च) उद्घाटन समारंभात तमन्ना भाटिया सहभागी होणार असल्याची माहिती देणारे ट्विट केले. आयपीएलने लिहिले, “टाटा आयपीएल उद्घाटन समारंभात तमन्नासोबत सामील व्हा. आम्ही जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सर्वात मोठा क्रिकेट महोत्सव साजरा करत आहोत.”

हेही वाचा – Virat Kohli Marksheet: विराट कोहलीने आयपीएलपूर्वी शेअर केली इयत्ता दहावीची मार्कशीट; जाणून घ्या कोणत्या विषयात होता कच्चा

सामना आणि उद्घाटन सोहळा कधी आणि केव्हा होणार –

३१ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहितीही आयपीएलने दिली आहे. त्यानंतर सात वाजता सीएसके आणि जीटी सामन्याची नाणेफेक होईल. त्यानंतर साडेसात वाजल्यापासून पहिला सामना खेळवला जाईल. उद्घाटन समारंभ आणि सामना स्टार स्पोर्ट्स इंडियावर थेट प्रक्षेपित केले जाईल. त्याच वेळी, ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर होईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ, रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता टायगर श्रॉफ देखील या सोहळ्यात दिसू शकतात. या तिघांच्या नावांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यापूर्वी, अभिनेत्री क्रिती सेनन, कियारा अडवाणी आणि पॉप गायक एपी ढिल्लन यांनी महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म केले होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 18:55 IST
Next Story
Virat Kohli Marksheet: विराट कोहलीने आयपीएलपूर्वी शेअर केली इयत्ता दहावीची मार्कशीट; जाणून घ्या कोणत्या विषयात होता कच्चा
Exit mobile version