IPL 2024 Mumbai Indians Players: मुंबई इंडियन्स संघाचा सलग तीन पराभवांनंतर आता आपला पुढील सामना ७ एप्रिलला खेळणार आहे. तत्त्पूर्वी मुंबईच्या सोशल मिडियावर एक व्हीडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये संघाचे काही खेळाडू हे सुपरमॅनचा जम्पसुट घालताना दिसत आहे.यापैकी इशान किशनचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. पण खेळाडूंनी हा सुपरमॅनचा अवतार का केला, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्समध्ये एक वेगळीच आणि मजेशीर प्रथा आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील जे खेळाडू संघाच्या मिटींगला उशिरा येतात, त्यांना एक शिक्षा दिली जाते. या उशिरा येणाऱ्या खेळाडूंना सर्वांसमोर प्रवासात शिक्षेचा भाग म्हणून जम्पसूट घालायचा असतो. यावेळेस मुंबईचे इशान किशन, नुवान तुषारा, कुमार कार्तिकेय आणि शम्स मुलानी या वेशात दिसले. हे सर्व खेळाडू या आगळ्यावेगळ्या सुपरमॅनच्या पोशाखासहित एअरपोर्टवर दिसले. ज्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले जात आहेत.

मुंबई इंडियन्सचा लोगो असलेला निळ्या रंगाचा हा सुपरमॅनचा आऊटफिट आहे आणि हा अवतार संपूर्ण प्रवासात त्यांना घालून राहणे भाग होते. आयपीएलचा १७ वा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत खूपच निराशाजनक राहिला आहे. संघाने लीगमधील पहिले तीन सामने खेळले असून हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने तीनही सामने गमावले आहेत. संघाला आपले खातेही उघडता न आल्याने मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 mumbai indians player in punishment jumpsuits of superman during travels ishan kishan kumar kartikeya shams mulani nuwan thushara watch video bdg