मुंबईचा नवा तडाखेबंद खेळी करणारा फलंदाज रोमारियो शेफर्डने अखेरच्या २० व्या षटकात ३२ धावा करत मुंबईची धावसंख्या २३४ वर नेली. नॉर्कियाच्या अखेरच्या षटकात त्याने चार षटकार आणि दोन चौकारांसह वानखेडेवर सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. या ३२ धावांसह शेफर्डने अवघ्या १० चेंडूत ३९ धावा केल्या आहेत. त्याच्या तुफानी ३२ धावांसह मुंबईने दिल्लीच्या संघाला विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य दिले आहे. २३४ धावा ही वानखेडेवरील आयपीएलमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.
शेफर्डने त्याच्या खेळीत या १० चेंडूंचा सामना करत ३९० च्या स्ट्राईक रेटने नाबाद ३९ धावा केल्या. यासह शेफर्डने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. रोमारियो शेफर्ड हा आयपीएलमध्ये सर्वाधिक बॅटिंग स्ट्राइक रेटने ( १० चेंडू खेळल्यानंतर) धावा करणारा फलंदाज बनला आहे. शेफर्ड याबाबतीत पॅट कमिन्सला मागे सोडले आहे. कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध १५ चेंडूत ३७३ च्या स्ट्राईक रेटने ५६ धावा केल्या होत्या. एबी डिव्हिलियर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध ११ चेंडूत ३७२.७२ च्या स्ट्राईक रेटने ४१ धावा केल्या. तर आंद्रे रसेलने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध ३६९.२३ च्या स्ट्राइक रेटने १३ चेंडूत ४८ धावा केल्या होत्या.
शेफर्डने २०व्या षटकात अशा कुटल्या ३२ धावा
पहिला चेंडू-चौकार
दुसरा चेंडू – षटकार
तिसरा चेंडू – षटकार
चौथा चेंडू – षटकार
पाचवा चेंडू – चौकार
सहावा चेंडू – षटकार
आयपीएल सामन्यातील २०व्या षटकात सर्वाधिक धावा
३६ धावा – रवींद्र जडेजा विरुद्ध आरसीबी
३२ धावा – रोमॅरियो शेफर्ड विरुद्ध डीसी
३० धावा – रिंकू सिंग विरुद्ध जीटी
२८ धावा – हार्दिक पांड्या विरुद्ध आरपीएस
२८ धावा – श्रेयस अय्यर विरुद्ध केकेआर