IPL 2025 Full Prize Winner List: आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ६ धावांनी विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली आहे. गेल्या १७ वर्षांची प्रतिक्षा संपवत या संघाने पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान फायनल जिंकल्यानंतर, विजेत्या, उपविजेत्या संघासह खेळाडूंना किती रक्कम मिळाली? जाणून घ्या.या हंगामात विजेत्या ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आयपीएलच्या ट्रॉफीसह २० कोटी रुपये मिळाले आहेत. तर उपविजेत्या ठरलेल्या पंजाब किंग्ज संघाला १३ कोटी रूपये मिळाले आहेत. यासह वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा या स्पर्धेत पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे.त्याला १० लाख रुपये मिळाले आहेत. तर युवा फलंदाज साई सुदर्शन ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. त्याला देखील १० लाख रूपये मिळाले आहेत. या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिलेल्या मुंबई इंडियन्सने ७ कोटींची कमाई केली आहे. तर चौथ्या स्थानी राहिलेल्या गुजरात टायटन्स संघाने ६ कोटींची कमाई केली आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

आयपीएल २०२५ स्पर्धेत पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी

आयपीएल २०२५ विजेते – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)- २० कोटी
आयपीएल २०२५ उपविजेता संघ – पंजाब किंग्ज – १३ कोटी
आयपीएल २०२५ स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिलेला संघ- मुंबई इंडियन् – ७ कोटी
आयपीएल २०२५ स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिलेला संघ – गुजरात टायटन्स – ६ कोटी
आयपीएल २०२५ अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच – जितेश शर्मा -१ लाख
आयपीएल २०२५ अंतिम सामना प्लेयर ऑफ द मॅच – क्रुणाल पांड्या- १ लाख
आयपीएल २०२५ सीझनमधील सर्वाधिक डॉट बॉल्स – मोहम्मद सिराज -१० लाख
आयपीएल २०२५ उदयोन्मुख खेळाडू – साई सुदर्शन – २० लाख
आयपीएल २०२५ सुपर स्ट्रायकर (सर्वाधिक षटकार) – निकोलस पूरन – १० लाख
आयपीएल २०२५ मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर – सूर्यकुमार यादव – १० लाख
आयपीएल २०२५ परफेक्ट कॅच ऑफ द सीझन – कमिंदू मेंडिस- १० लाख
आयपीएल २०२५ पर्पल कॅप – प्रसिद्ध कृष्णा -१० लाख
आयपीएल २०२५ ऑरेंज कॅप – साई सुदर्शन- १० लाख
आयपीएल २०२५ फेअरप्ले पुरस्कार – चेन्नई सुपर किंग्ज<br>आयपीएल २०२५ सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदान – दिल्ली (डीडीसीए)

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 full prize winners list runner up orange cap purple cap emerging players prize list amd