भारतीय क्रिकेटचा वर्तमान आणि भविष्य यांच्यातील लढाईत विराट कोहलीच्या खांद्यावर टीम इंडियाचे ओझे उचलण्यास सज्ज असल्याचे शुबमन गिलने सिद्ध केले आहे. खुद्द कोहलीने काही दिवसांपूर्वी शुबमनचा अंदाज वर्तवला होता, या फलंदाजाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या आयपीएल २०२३ च्या शेवटच्या लीग सामन्यात खरा ठरला. “पुढे जा आणि टीम इंडियाच्या पुढच्या पिढीचे नेतृत्व कर. देव तुला आशीर्वाद देवो.” शुबमन गिलच्या पहिल्या आयपीएल शतकानंतर, विराटने आपल्या इन्स्टा स्टोरीवर हे शेअर केले होते आणि आता गिलने विराटची टीम आरसीबीविरुद्ध शतक ठोकून हे सिद्ध केले की तो भारतीय संघात जबाबदारी हाताळण्यास तयार आहे.

खुद्द शुबमन गिलने हे अनेकदा सांगितले आहे की तो विराट कोहलीला खेळताना बघून मोठा झाला आहे आणि त्याला आपला आदर्श मानतो. अंडर-१९ विश्वचषकातून परतल्यानंतर गिलने सांगितले होते की, “मला विराट कोहलीप्रमाणे खेळायचे आहे. तो ज्या पद्धतीने दबाव हाताळतो. मलाही तेच करायचे आहे. मग त्याने सांगितले की त्याच्या फावल्या वेळात तो यूट्यूबवर विराट कोहलीची जुनी खेळी पाहतो आणि नंतर नेटमध्ये त्याच्या शॉट्सचा सराव करतो.”आज त्याने त्याच्याच आदर्शाला हरवले.

हेही वाचा: IPL 2023: बंगळुरूचा ट्रॉफीसाठी वाढला वनवास! पराभवानंतर कोहलीचे चाहते शुबमन गिलवर भडकले, सोशल मीडियावर झाला ट्रोल

अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये गिल चमकला

२०१८च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेटला विराट कोहलीच्या पलीकडे नेणारा फलंदाज म्हणून शुबमन गिलला ओळखले जात आहे आणि रविवारी, गिलने आपल्या गुरूला आपण भारतीय संघाची भार खांद्यावर उचलण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले. पुढील दशक हे भारतीय क्रिकेटचे असेल. त्यामुळे शुबमनच्या नावावर अनेक विक्रम होतील.

गिलमध्ये कोहलीची झलक पाहायला मिळत आहे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या १९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिलने आपल्या फलंदाजीचा असा पैलू दाखवला जो विराटशी जुळतो. गिलची ही खेळी पहिल्यानंतर तो कोहलीला पाहून धावांचा पाठलाग करण्याची कला शिकतोय, असं क्रिकेट जगतातील दिग्गजांना वाटत होत. गिलने जोखीम पत्करत अनेक मोठे फटके मारले आणि गरज असेल त्यावेळी त्याने एकेरी-दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित केले. विराट ज्या प्रकारे शेवटच्या चेंडूपर्यंत संघासाठी मैदानात उभा राहिला, त्यानेही तसेच करत संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: IPL 2023: इशानपासून चावलापर्यंत आरसीबीच्या पराभवावर मुंबई इंडियन्सचा जल्लोष, प्लेऑफमध्ये पोहोचल्याच्या आनंदात केला डान्स; Video व्हायरल

शुबमनने रचला नवा विक्रम रचत कोहलीच्या क्लबमध्ये झाला सामील

आयपीएल २०२३च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी, आरसीबीला लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सवर विजय नोंदवणे आवश्यक होते. बंगळुरूने प्रथम गोलंदाजी केली आणि विराट कोहलीने सलग दुसरे शतक झळकावले. शिखर धवन आणि जोस बटलरनंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. पण, दोन तासांनंतर आणखी एक फलंदाज या क्लबमध्ये प्रवेश करेल याचा अंदाज कोहलीलाही बसला नसेल आणि गिलने त्याच्या आदर्श मार्गावर चालत आयपीएल २०२३मध्ये सलग दुसरे शतक ठोकले. विराटप्रमाणेच त्यानेही आपले शतक पूर्ण केले, २०व्या षटकात तोही विराटप्रमाणे नाबाद परतला. शुबमन गिलने ५२ चेंडूत १०४ धावांची नाबाद खेळी केली. त्याचवेळी कोहलीने ६१ चेंडूत १०१ धावा केल्या.