Kuldeep Yadav Record, MI vs DC: आयपीएल स्पर्धेतील ६३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान प्रथम गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

कुलदीपच्या १०० विकेट्स पूर्ण

कुलदीप यादव हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्या फिरकीची जादू आयपीएल स्पर्धेतही पाहायला मिळाली आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने विस्फोटक फलंदाज रायन रिकल्टनला झेलबाद करत माघारी धाडलं. हा कुलदीप यादवच्या आयपीएल कारकिर्दीतील १०० वा विकेट ठरला आहे.

कुलदीप यादवने हा कारनामा आपल्या आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६३ व्या सामन्यात करून दाखवला आहे. रायन रिकल्टन हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १०० वा विकेट ठरला आहे. यासह तो आयपीएल स्पर्धेत १०० विकेट्स घेणारा जगातील २९ वा गोलंदाज ठरला आहे.

कुलदीप यादवच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्याने आतापर्यंत ९७ सामन्यांमध्ये २७ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ वेळेस एकाच डावात ४ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दिल्ली कॅपिटल्स (Playing XI): फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), समीर रिजवी, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुस्ताफिजुर रहमान, मुकेश कुमार

मुंबई इंडियन्स (Playing XI): रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सॅन्टनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह</p>

इम्पॅक्ट प्लेअर्स –

दिल्ली कॅपिटल्स: के. एल. राहुल, सेदिकुल्लाह अटल, करुण नायर, त्रिपुराना विजय, मनवंत कुमार एल.
मुंबई इंडियन्स: कर्ण शर्मा, कॉर्बिन बॉश, राज बावा, अश्वनी कुमार, सत्यनारायण राजू.