IPL 2025 Mohammed Shami Unique Record: चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सामना खेळवला जात आहे. मोहम्मद शमीने या सामन्यात खेळताना अनोखी कामगिरी केली आहे. शमीने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेत इतिहास घडवला. पण शमीने पुढच्याच चेंडूवर नो बॉल टाकला. पण या अनोख्या नो बॉलनेही सर्वांचं लक्ष वेधलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद शमी रनअप घेत असताना त्याच्या हाताने त्याने नॉन स्ट्राईकर एंडच्या बेल्स उडवल्या. ज्यामुळे नो बॉल देण्यात आले. गोलंदाजाने जर त्याचा रनअप करण्यापूर्वी बेल्स पडल्या तर तो नो बॉल दिला जातो. पण फ्री हिटवर शमीने यॉर्कर टाकत मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही.

मोहम्मद शमीने या सामन्याची सुरुवात अतिशय धमाकेदार पद्धतीने केली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर शेख रशीदची विकेट घेतली. आयपीएलमध्ये चौथ्यांदा शमीने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. चार वेळा हा पराक्रम करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. याशिवाय, तो आयपीएलमध्ये चौथ्यांदा डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम करणारा पहिला गोलंदाज बनला.

आयपीएल सामन्यात पहिल्या चेंडूवर सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

४ वेळा – मोहम्मद शमी<br>२ वेळा – डर्क नॅनेस
२ वेळा – लसिथ मलिंगा
२ वेळा – उमेश यादव<br>२ वेळा – भुवनेश्वर कुमार<br>२ वेळा – ट्रेंट बोल्ट

चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना चेपॉकच्या अवघड खेळपट्टीवर १५४ धावा केल्या आहेत. नवा सलामीवीर आयुष म्हात्रे आणि पदार्पणवीर डेवाल्ड ब्रेविस यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावली. याशिवाय ४००वा टी-२० सामना खेळणारा एम एस धोनी या सामन्यात अपयशी ठरला आणि ६ धावा करत बाद झाला. हैदराबाद या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणं आवश्यक आहे. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत ८-८ सामने खेळले आहेत आणि २-२ सामने जिंकले आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed shami becomes first bowler who took first ball wicket 4 times in ipl csk vs srh bdg