पृथ्वी शॉ चांगलाच गोंधळला, जसप्रितच्या बाऊन्सरचा सामना करताना थेट खाली कोसळला; झाला झेलबाद

सुरुवातीला फलंदाजीसाठी आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खराब झाली.

prithvi shaw and jasprit bumrah
पृथ्वी शॉ र्णि जसप्रित बुमराह (फोटो- iplt20.com)

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. आजच्या सामन्यात विजय अनिवार्य असल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ पूर्ण ताकतीने मैदानात उतरला आहे. मात्र या संघाची सुरुवात काहीशी खराब झाली. डेविड वॉर्नरच्या रुपात पहिली विकेट गेल्यानंतर पृथ्वी शॉ विचित्र पद्धतीने बाद झाला. जसप्रित बुमराहने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूवर पृथ्वी शॉ चांगलाच गोंधल्याचे दिसले.

हेही वाचा >> भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी लवकरच संघाची घोषणा; उमरान मलिक, दिनेश कार्तिक यांना संधी मिळण्याची शक्यता

सुरुवातीला फलंदाजीसाठी आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खराब झाली. संघाच्या २१ धावा झालेल्या असताना डेविड वॉर्नर अवघ्या पाच धावांवर बाद झाला. त्यानंतर संघाची जबाबदार पृथ्वी शॉवर आली. त्याने सुरुवातीपासून चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मैदानावर सेट होत असतानाच तो जसप्रित बुमराहच्या चेंडूवर झेलबाद झाला. दिल्ली कॅपिटल्सच्या ३१ धावा झालेल्या असताना मुंबई संघाकडून जसप्रित बुमराहकडे चेंडू देण्यात आला. त्यानेदेखील या संधीचे सोने केले. पृथ्वी शॉला बाद करण्यासाठी त्याने बाऊन्सर चेंडू टाकला. याच चेंडूचा सामना करताना पृथ्वी शॉ गोंधळला.

हेही वाचा >> बंगळुरुकडून मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना, लिहिलं खास पत्र; प्लेऑफचं नेमकं गणित काय?

चेंडूकडे पाहताच पृथ्वी शॉ घाबरला. त्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी हात वर केले. मात्र हाताला लागून चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. तर दुसरीकडे या चेंडूचा सामना केल्यानंतर पृथ्वी शॉ थेट जमिनीवर पडला. चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे गेल्यामुळे शॉला बाद म्हणून जाहीर करण्यात आले. परिणामी दिल्ली संघाची ३१ धावांत तन गडी बाद अशी अवस्था झाली. वीस षठक

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prithvi shaw catch out on jasprit bumrah bouncer ball in mi vs dc match prd

Next Story
IPL 2022, MI vs DC Update : मुंबईचा दिल्लीवर पाच गडी राखून विजय, बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये
फोटो गॅलरी