IPL 2025 Rahul Dravid Video: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १० दिवसांमध्ये आयपीएल २०२५ चा पुढील सीझन सुरू होत आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या तयारीसाठी सर्व १० फ्रँचायझींचे प्री-सीझन कॅम्पही सुरू झाले आहेत. यंदा सर्वच संघांचे चित्र बदलले असणार आहे, अनेक खेळाडूंची अदलाबदली झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कॅम्पमधून एक व्हीडिओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल २०२५ च्या सीझनमध्ये भारताच्या क्रिकेट संघाचे माजी हेड कोच राहुल द्रविड आता राजस्थान रॉयल्सच्या हेड कोचच्या भूमिकेत दिसणार आहेत. आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी संघाच्या ट्रेनिंग कॅम्पमधील राहुल द्रविड पोहोचले होते, तेव्हा ते क्रॅचेसच्या सहाय्याने चालताना दिसले. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे, त्य़ापूर्वी राजस्थान रॉयल्सने राहुल द्रविड यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो शेअर करत माहिती दिली होती.

राजस्थान रॉयल्स संघाच्या सराव सत्रादरम्यान राहुल द्रविड पोहोचले, तेव्हा प्रथम तो गोल्फ कार्टच्या गाडीमध्ये बसून आले, त्यानंतर जेव्हा द्रविड खाली उतरले तेव्हा त्यांना चालण्यासाठी कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. द्रविड यांचा हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. प्रशिक्षणादरम्यान, जेव्हा द्रविड खुर्चीवर बसले होते तेव्हा त्यांनी दुसरा पाय समोरच्या खुर्चीवर सरळ ठेवला होता. यादरम्यान द्रविड राजस्थान संघातील युवा खेळाडूंना भेटताना दिसले. दरम्यान यशस्वी जैस्वालसह फलंदाजीबाबत चर्चा करतानाही दिसले.

राहुल द्रविडला कधी झाली दुखापत?

बंगळुरूमध्ये क्रिकेट सामना खेळताना राहुल द्रविड यांच्या पायाला दुखातप झाली होती. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या दुखापतीबाबत अपडेट दिले होते, ज्यामध्ये त्यांच्या रिकव्हरीबद्दल माहिती दिली होती. दुखापतीनंतर आता राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात राहुल द्रविड सामील झाले आहेत.

आयपीएलच्या १८ व्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स संघ संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे, ज्यामध्ये यावेळी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही नवीन चेहरे देखील दिसणार आहेत. राजस्थान रॉयल्सचा हंगामातील पहिला सामना २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. जो सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर राजस्थानला आपले पुढचे २ सामने गुवाहाटीच्या मैदानावर खेळायचे आहेत, जे कोलकाता आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध असतील.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid reaches rajasthan royals camp practice session with crutches ahead of ipl 2025 watch video bdg