Ravindra Jadeja Says Fans Are Waiting For Me To Get Out: आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने डीसीचा २७ धावांनी पराभव केला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शानदार फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ८ गडी गमावून १६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १४० धावाच करु शकला. या सामन्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपले दु:ख व्यक्त केले. तो म्हणाला की चाहते त्याच्या बाद होण्याची प्रतीक्षा करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र जडेजाने सामन्यानंतर याचा खुलासा करताना सांगितले की, चाहते त्याच्या बाद होण्याची प्रतीक्षा का आणि कशी करतात. धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते मी लवकर आऊट होण्याची वाट पाहत असल्याचे त्याने सांगितले. जड्डू म्हणाला, “जर मी लवकर फलंदाजीसाठी आलो तर ते सर्वजण ‘माही माही’ म्हणतात आणि एमएस धोनीला पाहण्यासाठी प्रार्थना करतात, ते सर्व मी आऊट होण्याची वाट पाहत असतात.”

धोनीने शानदार खेळी केली –

दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आठव्या क्रमांकावर आला आणि त्याने शानदार खेळी केली. त्याने २२२.२२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ९ चेंडूत २० धावा केल्या. त्याच्या खेळीत २ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. धोनीच्या या खेळीमुळे चेन्नईला चांगली धावसंख्या गाठता आली.

हेही वाचा – DC vs CSK: दिल्ली कॅपिटल्सच्या ललित यादवने पकडला अप्रतिम झेल, चाहत्यांसह पंचही झाले थक्क, पाहा VIDEO

धोनी आतापर्यंतच्या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्म दिसून आला आहे –

महेंद्रसिंग धोनीने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत आपल्या चाहत्यांना निराश केलेले नाही. त्याने अनेक उत्तम डाव खेळले आहेत. धोनी आतापर्यंत ८ डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे, ज्यामध्ये त्याने ४८ च्या सरासरीने आणि २०४.२६ च्या स्ट्राइक रेटने ९६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ३२* आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण १० षटकार आणि ३ चौकार आले आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra jadeja said csk fans are waiting for me to get out vbm