आयपीएलच्या १७ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) नेहमीप्रमाणे चमकदार कामगिरी करता आलेली नाही. गुणतालिकेत आरसीबीचा संघ सर्वात खालच्या स्थानावर आहे. सात सामन्यात केवळ एक सामना आरसीबीला जिंकता आला आहे. आरसीबीचा आलेख कसाही असला तरी संघातील तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीची क्रेझ काही कमी होत नाही. प्रेक्षकच नाही तर इतर संघातील खेळाडूनही विराटचे चाहते आहेत. आज (दि. २१ एप्रिल) कोलकाता नाईट राईडर्सचा (KKR) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडणार आहे. त्याआधी केकेआरचा फलंदाज विराट कोहलीकडे गळ घालण्यासाठी पोहोचला. “मागच्या सामन्यात तू दिलेली बॅट तुटली…”, हे सांगण्यासाठी रिंकू सिंह जेव्हा विराटकडे गेला, तेव्हा त्यांच्यात काय संभाषण झालं, हे पाहू.

केकेआरच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू सिंह आणि विराट कोहली बोलताना दिसतात. त्यांच्यातील संभाषण पुढीलप्रमाणे :

IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

रिंकू : फिरकूपटूला फटका मारताना माझ्याकडून बॅट तुटली.

विराट : माझी बॅट तुटली?

रिंकू : हो

विराट : फिरकूपटूच्या गोलंदाजीवर बॅट तुटली. कुठे तुटली नक्की.

रिंकू : (कोहलीची बॅट हातात घेऊन) खालच्या बाजूला तुटली.

विराट : मी काय करू मग?

रिंकू : काही नाही. मी फक्त सांगायला आलो होतो.

विराट हे काही ठिक नाही यार

रिंकू : तर पुन्हा पाठवणार का?

विराट : कुणाला पाठवू?

रिंकू : घ्या तुमची बॅट ठेवा

मी विश्वचषक खेळण्यास तयार – कार्तिक

विराट : एका सामन्यापूर्वीच तू बॅट घेऊन गेला होतास. दोन सामन्यात तुला दोन बॅट देऊ. तुझ्यामुळे नंतर माझी अवस्था वाईट होते.

रिंकू : तुमची शपथ घेऊन सांगतो. पुन्हा बॅट तोडणार नाही. ती तुटलेली बॅटही तुम्हाला दाखवतो.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नवे चॅम्पियन्स आतापर्यंत दिसून आले आहेत. राजस्थान रॉयल्स सात पैकी सहा सामने जिंकून सर्वात वरच्या स्थानी आहेत. तर त्यांच्या खालोखाल दुसऱ्या स्थानी सनरायजर्स हैदराबाद, केकेआर आणि सीएसके संघ आहेत.

आरसीबीने सात सामन्यात केवळ एक दिल्लीविरोधातला सामना जिंकण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे उरलेल्या हंगामात आरसीबी सन्मानजनक कामगिरी करणार का? हे पाहावे लागेल.