आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४१ व्या सामन्यात दिल्ली आणि कोलकाता यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी पूर्ण ताकतीने संघर्ष केला. सुरुवातीला फलंगाजीसाठी आलेल्या कोलकाताला संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कोलकाता संघाला १४६ धावा करता आल्या. दरम्यान, दिल्लीचा कर्णधार तथा यष्टीरक्षक ऋषभ पंत याने क्षेत्ररक्षणात दिमाखदार कामगिरी केली. श्रषभ पंतचा खेळ पाहण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड इशा नेगीने प्रेक्षक गॅलरीत हजेरी सावली. इशा नेगी ऋषभ पंतला चिअर करताना दिसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> पहिला सामना, पहिलं षटक! चेतन सकारियाने आरॉन फिंचला केलं त्रिफळाचित

सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला आरॉन फिंच अवघ्या तीन तर व्यंकटेश अय्यर सहा धावांवार बाद झाला. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने कोलकाताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र ४२ धावांवर असताना यष्टीरक्षक ऋषभ पंतने त्याचा झेल टिपला. तसेच पुढे ऋषभ पंतने आंद्र रसेलला यष्टीचित केलं. याच कामगिरीमुळे मैदानात ऋषभ पंतचा जयजयकार केला जात होता.

हेही वाचा >> Video : गुजरात-हैदराबाद सामन्यामध्ये मुथय्या मुरलीधरनला राग अनावर, डगआऊटमध्ये…

आजच्या सामन्याला ऋषभ पंतची गर्लफ्रेंड इशा नेगीने हजेरी लावली. इशा नेगी यावेळी ऋषभ पंत तसेच दिल्ली कॅपिटल्सला चिअर करताना दिसली. दिल्ली कॅपिटल्स संघासाठी चिअर करताना तिला कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. त्यानंतर तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हेही वाचा >> धोनीपासून ते राहुल तेवतियापर्यंत, जाणून घ्या IPL 2022 मधील असे पाच खेळाडू, ज्यांची फलंदाजी कायम स्मरणात राहील

दरम्यान, आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स दिल्लीसमोर मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. श्रेयस अय्यर आणि नितीश राणा वगळता केकेआरच्या अन्य एकाही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही. तर दिल्लीचे कुलदीप यादव आणि मुस्तफिजूर या दोन गोलंदाजांनी केकेआरच्या खेळाडूंना रोखून धरलं. वीस षटके संपेपर्यंत केकेआर संघ १४६ धावा करु शकला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant girlfriend isha negi spots during dc vs kkr match in ipl 2022 prd