Sanju Samson breaks Rohit Sharma’s record : आयपीएल २०२४ मधील २४व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ३ विकेट्सनी पराभूत करत त्यांच्या विजयरथाला रोखले. या सामन्यात राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजी करताना पराग आणि सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर १९७ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात गुजरातला राशिद खानने शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन विजय मिळवून दिला. हा सामना संजू सॅमसनचा कर्णधार म्हणून ५० वा सामना होता, या सामन्यात त्याने रोहित शर्मासह तीन कर्णधारांवा एका खास विक्रमाच्या बाबतीत मागे टाकले आहे.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात संजू सॅमसने ३८ चेंडूचा सामना करताना ७ चौकार आणि २ षटकांच्या मदतीने ६८ धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर त्याने रोहित शर्मासह तीन कर्णधारांना मागे टाकले. संजू सॅमसनने आयपीएलमधील कर्णधार म्हणून ५० व्या सामन्यात सर्वोच्च धावसंख्या नोदंवली आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याने २०१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४८ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून गौतम गंभीरने २०१३ मध्ये ४६ चेंडूत ५९ धावा केल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नरने २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३३ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या.

संजू सॅमसनने जोस बटलरला टाकले मागे

याशिवाय संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक ५० हून अधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने १३१ डावात २५ वेळा ही कामगिरी केली आहे. जोस बटलरने ७६ डावात २४ वेळा अशी कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणेने ९९ डावात २३ वेळा अशी कामगिरी केली आहे. शेन वॉटसनने ८ डावात १६ वेळा अशी कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने ४२ डावात ९ वेळा अशी कामगिरी केली आहे.

हेही वाचा – IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज

परागसह तिसऱ्या विकेट्साठी साकारली १३० धावांची भागीदारी –

गुजरात टायटन्सविरुद्ध संजू सॅमसनने रियान परागसह १३० धावांची भागीदारी केली. राजस्थान रॉयल्ससाठी तीन किंवा त्यापेक्षा कमी विकेटसाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. संजू सॅमसन आणि बेन स्टोक्स या जोडीच्या नावावर सर्वात मोठ्या भागीदारीची नोंद आहे. २०२० मध्ये अबुधाबीमध्ये येथील सामन्यात दोघांमध्ये १५२ धावांची नाबाद भागीदारी झाली होती. रियान परागचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. त्याने ४८ चेंडूत ७६ धावा केल्या.