Arjun Tendulkar’s debut was similar to Sachin in IPL: सचिन तेंडुलकर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी रविवारचा दिवस खास होता. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रविवारी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि मुंबई इंडियन्सकडून पहिला सामना खेळला. दोन हंगाम बेंचवर बसल्यानंतर अखेर अर्जुन तेंडुलकरला पदार्पण करण्याची संधी मिळाली. अर्जुनची मोठी बहीण आणि सचिनची मुलगी सारा तेंडुलकरही हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जुनला चिअर करण्यासाठी बहीण सारा आली –

सारा तेंडुलकर अर्जुनपेक्षा मोठी आहे आणि ती वैयक्तिकरित्या तिच्या भावाच्या आयुष्यातील या खास क्षणाची साक्षीदार म्हणून आली होती. तिने मुंबई इंडियन्सची जर्सी घातली होती. सामन्यादरम्यान अर्जुनला पहिले षटक टाकायला मिळाले. तेव्हा साराच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती टाळ्या वाजवून भावाच्या कर्तृत्वाचा आनंद साजरा करत होती.

सारा तेंडुलकर इंस्टा स्टोरी

अर्जुन सचिन तेंडुलकरच्या वाटेवर –

यादरम्यान साराने अर्जुन तेंडुलकरशी संबंधित अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. यादरम्यान, तिने एक रेकॉर्ड देखील शेअर केला, जो सिद्ध करतो की अर्जुन त्याच्या वडिलांच्या मार्गावर चालत आहे. अर्जुनने रविवारी केकेआरविरुद्धच्या पहिल्याच षटकात पाच धावा दिल्या. त्याचवेळी सचिन तेंडुलकरनेही २००९ साली केकेआरविरुद्ध आयपीएलमध्ये पहिले षटक टाकले होते आणि त्यातही त्याने केवळ पाच धावा दिल्या होत्या.

सचिनने मुलगा अर्जुन तेंडुलकरला दिल्या शुभेच्छा –

सचिन आणि अर्जुन तेंडुलकर ही आयपीएलमध्ये एकाच संघासाठी खेळणारी पहिली पिता-पुत्र जोडी आहे. या खास प्रसंगी सचिनने आपल्या मुलाला शुभेच्छाही दिल्या. अर्जुनचा फोटो शेअर करत त्याने लिहिले, ‘अर्जुन, आज तू तुझ्या क्रिकेट प्रवासात एक नवीन पाऊल टाकले आहेस. मी एक वडील म्हणून तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि हा खेळ मला खूप आवडतो. मला माहित आहे की तू या खेळाचा आदर करशील.’

सारा तेंडुलकर इंस्टा स्टोरी

मुंबईने हा सामना पाच गडी राखून जिंकला –

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला आहे. मुंबईचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. त्याचवेळी कोलकाताचा तिसरा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने सहा गडी गमावून १८५ धावा केल्या होत्या. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने शानदार शतक (१०४ धावा) झळकावले. त्याचवेळी मुंबईच्या हृतिक शोकीनने दोन गडी बाद केले. यानंतर इशान किशनने ५८ आणि सूर्यकुमारने ४३ धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाजांच्या योगदानामुळे मुंबईने १७.४ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son arjun tendulkars debut was similar to sachin in ipl daughter sara shared a 14 year old coincidence vbm