Virat Kohli and Anushka Sharma Emotional RCB enter playoffs : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग सहा सामन्यात शानदार कामगिरी करून आयपीएल २०२४ च्या प्लेऑफ्समध्ये स्थान मिळवले आहे. एम चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या सामन्यात आरसीबीने सीएसकेचा २७ धावांनी पराभव करत प्लेऑप्समध्ये दमदार एन्ट्री केली. या विजयानंतर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा खूप भावूक झाली. अनुष्का शर्माच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले आणि चाहत्यांनी असे दृश्य पहिल्यांदाच पाहिले. ज्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र, सीएसकेच्या चाहत्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले पण ते आनंदाचे नसून निराशेचे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्लेऑफ्समध्ये पोहोचण्यासाठी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला चेन्नई सुपर किंग्जचा १८ किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने पराभव करायचा होता. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला केवळ १९१ धावांवर रोखत ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर आरसीबी संघासह चाहते विराट आणि अनुष्काच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ज्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्माची रिएक्शन व्हायरल –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा खूप भावूक झाले. विजयाचा आनंद साजरा करताना विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर अनुष्का शर्माने टाळ्या वाजवल्या, त्यावेळी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. कॅमेरामनने हा अतिशय खास क्षण लगेच आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. अनुष्का शर्माची ही रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IPL 2024: फॅफ डू प्लेसिस खरंच आऊट होता का? तिसऱ्या पंचांनी रनआऊट देताच विराटसह चाहतेही खवळले

अशक्य गोष्ट आरसीबीने शक्य करुन दाखवली –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी, आयपीएल २०२४ च्या प्लेऑफ्समध्ये पोहोचणे एका चमत्कारापेक्षा कमी नव्हते, कारण या संघाने पहिल्या ८ पैकी ७ सामने गमावले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने तरीही हार मानली नाही आणि त्यांचे पुढील सलग ६ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीची मोठी भूमिका राहिली. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएल २०२४ च्या १४ सामन्यांमध्ये ६४.३६ च्या सरासरीने ७०८ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and anushka sharmaemotional after rcb reaches ipl 2024 playoffs video going viral vbm