Ishan-Shubman breaks Ajinkya-Sikhar record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात इशान किशन आणि शुबमन गिल यांनी १४३ धावांची सलामी भागीदारी केली. या भागीदारीने २०१७ चा विक्रम मोडला आहे. खरे तर, वेस्ट इंडिजमध्ये भारतीय जोडीने सर्वोच्च सलामी भागीदारीचा विक्रम इशान आणि गिल यांच्या नावावर आहे. एवढेच नाही तर इशान आणि गिलची ही भागीदारी विंडीजमधील कोणत्याही विकेटसाठीची दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिल आणि इशानच्या भागीदारीने हा विक्रम मोडीत काढला –

इशान किशन आणि शुबमन गिल यांनी २०१७ मध्ये केलेला विक्रम मोडला. याआधी वेस्ट इंडिजमध्ये सर्वात मोठ्या ओपनिंग पार्टनरशिपचा विक्रम शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या जोडीच्या नावावर होता. रहाणे आणि धवन यांनी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये १३२ धावांची भागीदारी केली होती. त्याच वेळी, २००७ च्या विश्वचषकात सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात बर्म्युडाविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी २०२ धावांची भागीदारी झाली होती.

इशानने ७७ आणि गिलने ८५ धावांची केली खेळी –

शुबमन गिलच्या साथीने इशान किशनने वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. इशानने ४३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. १४३ धावांच्या भागीदारीनंतर ही भागीदारी इशानच्या विकेटने तुटली. इशान ६४ चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. इशानची विकेट लेगस्पिनर यानिक कारियाने घेतली. त्याचवेळी शुभमन गिलचे १५ धावांनी शतक हुकले. बमन गिल ९२ चेंडूत ८५ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार मारले. गुडाकेश मोतीने त्याला करियाकरवी झेलबाद केले.

हेही वाचा – IND vs WI 3rd ODI: विराट कोहलीला चाहते करतायत मिस, स्टेडियममध्ये झळकले पोस्टर

सध्या भारतीय संघाने ४५ षटकानंतर ४ बाद धावा केल्या आहेत. कर्णधार हार्दिकसोबत सूर्यकुमार यादव क्रीजवर आहे. हार्दिक पांड्या ३६ चेंडूत ३३ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव २३ चेंडूत २५ धावांवर नाबाद आहे. वेस्ट इंडिजकडून जेडेन सील्स आणि मेयर्स वगळता प्रत्येक गोलंदाजाने एक विकेट घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishan kishan and shubman gill formed the highest opening partnership for ind in wi vbm