IND vs AUS Starc Statement on KL Rahul controversial Dismissal: पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. पहिल्याच दिवशी एकूण १७ विकेट्स पडल्या. या विकेट्सदरम्यान केएल राहुलच्या विकेटवरून चर्चा सुरू आहे. राहुलला भारतीय डावादरम्यान वादग्रस्तरित्या बाद दिल्याने मोठा गोंधळ सुरू आहे. केएल राहुल मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टार्कने या विकेटवर मोठं वक्तव्य केलं आहे.

केएल राहुलच्या विकेटवरून वाद निर्माण झाला होता. मैदानावरील पंचांचा ‘नॉट आऊट’ निर्णय रद्द करण्याच्या तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर दोन्ही देशांच्या माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले. मैदानावरील पंच रिचर्ड केटलबरो यांनी राहुलच्या बाजूने नाबाद असल्याचा निर्णय दिला होता, पण यजमान संघाने डीआरएस घेतला. तिसरे पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी ‘स्प्लिट स्क्रीन व्ह्यू’ नीट न पाहता निर्णय बदलला. ‘स्प्लिट स्क्रीन व्ह्यू’ने त्यांना स्टार्कचा चेंडू खरोखरच बॅटला लागला होता की बॅट पॅडला लागली होती स्निकोमीटरवर हे स्पष्ट झाले कळले नाही.

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहचा पर्थ कसोटीत दुर्मिळ विक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज

पत्रकार परिषदेत स्टार्क म्हणाला, ‘हा निर्णय निश्चितच उलटला. पण मला वाटतं की ही नियमानुसार मिळवलेली विकेट होती. टायमिंग पाहून तरी मला वाटलं की ही एक नेहमीप्रमाणे मिळवलेली विकेट आहे. स्टार्कने (१४ धावांत द२ विकेट) यशस्वी जैस्वालला बाद करून मालिकेतील पहिली विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs AUS: सिराज आणि लबुशेन भर मैदानात एकमेकांशी भिडले, लबुशेनची कृती पाहून विराटही संतापला अन्… VIDEO व्हायरल

स्टार्क म्हणाला, “मला वाटतं आज खूप चांगली गोलंदाजी झाली. साहजिकच खेळपट्टीवर बरीच हालचाल होती आणि कदाचित तो ‘हार्डबॉल’ विकेट आहे असं वाटलं. स्टार्क पुढे म्हणाला, ‘जेव्हा भारतीय डावाच्या शेवटी चेंडू थोडा ‘मऊ’ होऊ लागला तेव्हा कदाचित तो पूर्वीइतका तितका प्रभावी नव्हता. खेळपट्टी अजूनही गोलंदाजांना मदत करत होती, पण ती नवीन ‘हार्डबॉल’सारखी प्रभावी नव्हती.”

स्टार्क म्हणाला, “मला वाटतं की संघांनी दुसऱ्या डावात यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे की कठीण काळात तुम्ही शांत राहिल्यास फलंदाजी करणे सोपे जाईल. आऊटफिल्ड खूपच संथ आहे त्यामुळे धावा काढणे थोडं कठीण होत आहे. इतकी संथ आउटफिल्ड बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाली”