Jasprit Bumrah Creates Rare Record in IND vs AUS Perth Test: भारतीय संघ पर्थ कसोटीच्या पहिल्याच डावात पहिल्या दिवशी १५० धावांवर सर्वबाद झाला. भारताला पहिल्या दिवशी सर्वबाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ खूपच आनंदात दिसत होता. पण दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा हा आनंद फार कमी काळ टिकला नाही. जसप्रीत बुमराहने सुरुवातीच्या षटकांमध्येच तीन मोठे विकेट घेत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. या सततच्या गमावलेल्या विकेट्समुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या धावांनाही चांगलाच ब्रेक लागला.

बुमराहच्या या तीन विकेट्समध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी आणि दिग्गज कसोटी क्रिकेटपटू स्टीव स्मिथ याला गोल्डन डकवर बाद केलं. बुमराहने स्टीव्ह स्मिथची विकेट घेताच ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघ फलंदाजी करत असताना या खेळपट्टीवर फलंदाजी करणे नक्कीच अवघड होतं, पण याचं प्रात्यक्षिक ऑस्ट्रेलियालाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी दिलं. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरने गुडघे टेकले.

हेही वाचा – KL Rahul Wicket Controversy: केएल राहुल आऊट की नॉट आऊट? तिसऱ्या पंचांनी घाईत दिला निर्णय अन् राहुलच्या विकेटमुळे सुरू झाला नवा वाद

भारताने दिलेल्या १५० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेला नॅथन मॅकस्विनीला बुमराहच्या तिसऱ्या षटकात पायचीत झाला. मैदानावरील पंचांनी बाद न दिल्याने कर्णधार बुमराहने चांगला रिव्ह्यू घेत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर सातव्या षटकात बुमराहने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला दोन मोठे झटके दिले.

हेही वाचा – IND vs AUS: “IPL लिलावात कोणता…”, ऋषभ पंतला नॅथन लायनने लिलावाबाबत विचारला प्रश्न, पंतने दिलं स्पष्टचं उत्तर, VIDEO होतोय व्हायरल

जसप्रीत बुमराहने सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला झेलबाद केले. जसप्रीत बुमराहने राउंड द विकेट गोलंदाजी केली आणि गुड लेंग्थवर टाकलेल्या चेंडूने बॅटची कड घेत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या हातात गेला. विराटने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना लबुशेनचा झेल सोडला होता पण नंतर बुमराहच्या गोलंदाजीवरच त्याने हा झेल टिपत संघाला मोठे यश मिळवून दिले.

हेही वाचा – IND vs AUS: विराट कोहली स्वत:च्या चुकीमुळे ‘असा’ झाला बाद, चेतेश्वर पुजाराने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुमराहच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते. या धक्क्यातून ऑस्ट्रेलिया सावरत नाही तोवर बुमराहने कांगारू संघाला सर्वात मोठा धक्का दिला. ख्वाजा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ गोल्डन डकवर बाद होत तंबूत परतला. ही विकेट घेत बुमराहने एक नवा पराक्रम केला आहे. स्टीव्ह स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये गोल्डन डकवर बाद करणारा जसप्रीत बुमराह जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन ही कामगिरी केली होती.