MI Retention and Release List IPL 2026: आयपीएल २०२६ साठीचे रिटेन्शन आज जाहीर होणार आहेत. रिटेन्शन डेडलाइनच्या आधी मुंबई इंडियन्सने ट्रेड डीलसह तीन खेळाडूंना ताफ्यात सामील केलं. तर एका खेळाडूला ट्रेड करत दुसऱ्या संघात धाडलं आहे. मुंबई इंडियन्सने अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरला लखनौ सुपर जायंट्सकडे ट्रेड केलं आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून लेग-स्पिनर मयंक मार्कंडेला ताफ्यात सामील केलं आहे. मुंबई इंडियन्सचा संघ त्यांच्या ५ महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन केलं आहे. याशिवाय संघाने कोणाला रिलीज केलं आहे पाहूया.

मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, रायन रिकल्टन, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, मिचेल सँटनर यांना रिटेन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे विघ्नेश पुथूरला मुंबई इंडियन्सने रिलीज केलं आहे.

अर्जुन तेंडुलकर त्याच्या ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीसह LSG (लखनौ सुपर जायंट्स) संघात सामील झाला आहे. महान सचिन तेंडुलकरचा लेक असलेल्या अर्जुनला MI ने २०२१ च्या आयपीएल लिलावात विकत घेतले होते. त्याने २०२३ मध्ये त्याने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केलं.

मयक मार्कंडेयही त्याच्या ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीसह आपल्या जुन्या संघात (MI) परतला आहे. मार्कंडेने २०१८, २०१९ आणि २०२२ मध्ये मुंबईसाठी खेळत आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तो २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्स, तर २०२३ आणि २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळला. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३७ सामने खेळले असून, ३७ विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईने यापूर्वी अष्टपैलू शार्दुल ठाकूर व शेरफेन रूदरफोर्ड या दोघांना ट्रेड करत संघात सामील केलं.

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, नमन धीर, शार्दुल ठाकूर, शेरफन रूदरफोर्ड, मयंक मार्कंडे, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, मिचेल सँटनर, कार्बिन बॉश, राज अंगद बावा, अल्लाह गजनफर, अश्वनी कुमार, रघु शर्मा

मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

सत्यनारायण राजू, रीस टोप्ले, के श्रीजीत, कर्ण शर्मा, अर्जुन तेंडुलकर, बेवॉन जेकब्स, मुजीब उर रहमान, लिजाद विलियम्स्, विघ्नेश पुथूर