ICC Announces WTC Final Prize Money: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी आयसीसीने बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. आयसीसी ने दिलेल्या माहितीनुसार, ओव्हलवर मैदानावर डब्ल्यूटीसी फायनल जिंकणाऱ्या टीमला $1.6 दशलक्ष (जवळपास १३.२३ कोटी रुपये) ची रक्कम मिळेल. एवढेच नाही तर अंतिम फेरीत हरणारा संघही करोडपती होईल. पराभूत संघाला आयसीसीकडून ६.६१ कोटी रुपये मिळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बक्षीस रकमेत कोणताही बदल नाही –

आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की २०२१ डब्ल्यूटीसी सायकलमध्ये जी बक्षीस रक्कम दिली गेली होती, तीच या वेळी देखील दिली जाईल, त्यात कोणताही बदल झालेला नाही. २०२१ सायकलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना खेळला गेला होता, जो न्यूझीलंडने जिंकला होता. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ सायकलसाठी एकूण $ 3.8 दशलक्ष (सुमारे ३१.४० कोटी रुपये) ठेवले होते, जे ९ संघांमध्ये विभागले गेले आहे.

कोणत्या संघाला किती मिळणार रक्कम?

भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांपैकी पहिले बक्षीस कोणाला मिळणार आणि दुसरे बक्षीस कोणाला मिळणार, हे अद्याप ठरलेले नाही. परंतु उर्वरित ७ संघांसाठी त्यांचे बक्षीस निश्चित आहे. डब्ल्यूटीसी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला सुमारे ३.७१ कोटी रुपये मिळतील. चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला २.८९ कोटी रुपये मिळतील. त्याचवेळी पाचव्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेला १.६५ कोटी रुपये मिळतील. श्रीलंकेचा संघ एकेकाळी फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत होता. या क्रमवारीत पाकिस्तान सातव्या क्रमांकावर राहिला तर त्याला जवळपास ८२ लाख रुपये मिळतील.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याशी संबंधित इतर माहिती –

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे प्रसारण अधिकार आयसीसीने खूप आधी घोषित केले होते. भारतात डब्ल्यूटीसी फायनलचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. याशिवाय, सामना डिस्ने + हॉटस्टारवर देखील लाइव्ह पाहता येईल.भारताव्यतिरिक्त हा सामना पाकिस्तानमधील युप्प टीव्हीवर प्रसारित केला जाईल. ऑस्ट्रेलियामध्ये फॉक्स स्पोर्ट्स, कायो आणि ICC.tv वर या सामन्याचे प्रसारण केले जाईल. या सामन्याचे प्रसारण बांगलादेशातील गाझी टीव्ही आणि अफगाणिस्तानमधील आरटीए स्पोर्टवर होईल.

डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ –

ऑस्ट्रेलिया संघ:

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, मार्कस हॅरिस, मॅट रेनशॉ, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, कॅमेरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, जिमी पीअरसन, पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, जोश हेझलवूड, नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मिचेल स्टार्क

हेही वाचा – IPL 2023: आकाश मधवालबद्दल वीरेंद्र सेहवागचे मोठं वक्तव्य; म्हणाला, “त्याच्या विक्रमाची पुनरावृत्ती करणे…”

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prize money announced for icc world test championship 2021 and 23 cycle ind vs aus final match vbm