भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. पंत दिल्लीहून रुरकी येथे आपल्या घरी आईला भेटण्यासाठी जात होता. दिल्ली-देहरादून महामार्गावर पहाटे ५.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पंतवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता आहे. पंतचा अपघात झाल्यानंतर दोन तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली होती. त्यांनीच जळत्या गाडीतून पंतचं सर्व सामान आणि पैसे बाहेर काढले होते. तसंच पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. रजत आणि निशू अशी या तरुणांची नावं असून न्यूज १८ ने दोघांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रजत आणि निशू साखर कारखान्यात काम करतात. आपण कामावर जात होतो तेव्हा पंतची गाडी दुभाजकावर आदळली अशी माहिती त्यांनी दिली आहे. “आम्ही ऋषभ पंतचं नाव ऐकलं होतं, पण त्याला पाहिलं नव्हतं. इतका मोठा क्रिकेटर इतक्या पहाटे येथे कसा काय असेल असा विचार आम्ही केला. हरियाणा रोडवेजच्या चालकाने रुग्णवाहिकेला फोन केला होता. आम्ही पंतला रुग्णवाहिकेतून जात असताना रस्त्यात गुगलवर त्याच्याबद्दल सर्च केलं. यावेळी पंतने आम्हाला नावाची स्पेलिंग योग्य टाका असं सांगितलं. त्याने स्वत: आम्हाला योग्य स्पेलिंग टाकून दाखवलं,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Rishabh Pant Accident Video: पंतचा अपघातानंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर होता उभा

“यानंतर त्याने आमचे आभार मानले आणि सोबत थांबण्यास सांगितलं. पण नंतर पोलिसांनी आम्हा दोघांना बाहेर काढलं. रुग्णवाहिकेत असताना आम्ही त्याच्या आईच्या मोबाइलवर फोन केला होता. पण त्यांचा नंबर स्वीच ऑफ होता,” असं त्यांनी सांगितलं.

Rishabh Pant Accident CCTV: ऋषभ पंतच्या अपघाताचं सीसीटीव्ही आलं समोर, पाहा व्हिडीओ

रजत आणि निशू यांनी सांगितलं की “रुग्णवाहिका पंतला घेऊन सरकारी रुग्णालयात जात होती. पण आम्ही त्यांना सक्षम रुग्णालय जवळ असून तिथे लवकर पोहोचू शकतो असं सांगितलं. हा देशाचा खेळाडू असून लवकर उपचार मिळाले पाहिजे असं आम्ही सांगत होतो”.

Rishabh Pant Car Accident: पंतला मैदानात परतण्यासाठी लागणार ‘इतका’ कालावधी; पाहा, काय म्हणाले डॉक्टर

राज्य सरकारची १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिका रुग्णांना शक्यतो रुग्णांना घेऊन सरकारी रुग्णालयातच जाते. पण या तरुणांच्या सांगण्यावरुन चालकाने पंतला सक्षम रुग्णालयात नेलं. येथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. काही वेळाने पंतला देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नातेवाईकांना कळवलं. रजत आणि निशू यांनी सांगितलं की, आम्ही जळत्या कारजवळ पोहोचलो तेव्हा पंत स्वत: काच फोडून बाहेर आला होता आणि रस्त्यावरच झोपला होता. त्याने फार हिंमत दाखवली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajat and nushu who saved rishabh pant reveals what happened on accident day sgy