Rishabh Pant Car Accident Video: भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला असून, देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पंत दिल्ली येथून देहरादूनला जात असताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कारला आग लागल्याने बाहेर पडण्यासाठी पंतला काच फोडावी लागली. दरम्यान पंतचा अपघातानंतरचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये ब्लँकेट गुंडाळून उभा असलेल्या पंतच्या चेहऱ्यावर रक्त दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओत कारला आग लागलेली असून पंत जखमी अवस्थेत खाली झोपल्याचं दिसत आहे.

ऋषभ पंत आपल्या मर्सिडीज कारने दिल्लीहून रुरकीला जात होता. यावेळी पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ १०८ ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केलं. पंतला गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता आहे.

a young man was saved due to wearing helmet
VIDEO : हेल्मेट घातले म्हणून वाचला; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Mumbai road accident 2 girls injured after being hit by speeding car shocking video
मुंबईत रस्ता ओलांडताना भीषण अपघात; चूक कुणाची? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
woman dancing after on climbing a tree funny reels
“अहो ताई, जरा सांभाळून….”, झाडावर चढून नाचतेय ही तरुणी, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू
a lady cherishes motherhood with passion
VIDEO : बाळ कडेवर घेऊन वाजवतेय ढोल ताशा! आवडीबरोबर मातृत्व जपणाऱ्या आईचा व्हिडीओ व्हायरल

Rishabh Pant Accident CCTV: ऋषभ पंतच्या अपघाताचं सीसीटीव्ही आलं समोर, पाहा व्हिडीओ

उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी अपघात झाला तेव्हा कारमध्ये पंत एकटाच होता याला दुजोरा दिला आहे. तसंच अपघातानंतर कारला आग लागल्याने काच फोडून तो बाहेर आल्याची माहिती दिली आहे.

“पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास पंतच्या कारचा अपघात झाला. पंतने दिलेल्या माहितीनुसार, त्याला झोप लागल्याने कारने रस्ता सोडला आणि दुभाजकाला जाऊन आदळली. अपघातानंतर कारला आग लागली होती. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्याला देहरादूनला हलवण्यात आलं,” अशी माहिती अशोक कुमार यांनी दिली आहे.

Rishabh Pant Car Accident : ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत बीसीसीआय सचिव जय शाहांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Rishabh Pant Car Accident News: ६७ लाखांच्या Mercedes GLCमध्ये झाला ऋषभचा अपघात; जाणून घ्या, पंतची एकूण संपत्ती किती

पंतचं डोकं, गु़डघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसंच पाय मोडला असल्याची शक्यता असून देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.