Yashasvi Jaiswal equals Rohit Sharma record : तीन सामन्यांच्या टी-२०मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १९.२ षटकांत १७० धावांवर गारद झाला. या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी केली. या सामन्यात यशस्वी जैस्वाल अर्धशतक पूर्ण पूर्ण करेल असे वाटत होते, पण त्याचे अर्धशतक हुकले. पल्लेकेले स्टेडियमवर त्याने २१ चेंडूत ४० धावांची खेळी साकारली. या खेळीत यशस्वीने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. यशस्वीचे अर्धशतक हुकले असले, तरी विशेष यादीत त्याने रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली. जे काम रोहितने १७ वर्षात केले होते, ते यशस्वीने अवघ्या ११ महिन्यांत केले. खरे तर, टी-२० पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा ४० किंवा त्याहून अधिक धावा करणारा यशस्वी भारताचा संयुक्त पहिला खेळाडू ठरला आहे. यशस्वी आणि रोहितने प्रत्येकी चार वेळा ही कामगिरी केली आहे. यशस्वीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर, रोहित शर्माने सप्टेंबर २००७ ते जून २०२४ या कालावधीत क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये खेळला आहे. ''हिटमॅन' या नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहितने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा ४० हून अधिक धावा करणारे फलंदाज - ४ - रोहित शर्मा४ - यशस्वी जैस्वाल२ - शिखर धवन२- केएल राहुल१- वीरेंद्र सेहवाग१- रॉबिन उथप्पा१- ऋतुराज गायकवाड हेही वाचा - ENG vs WI : जो रुटने ब्रायन लाराला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही कामगिरी करणारा ठरला जगातील सातवा फलंदाज श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या भारताच्या यशस्वीने शुबमन गिल (१६ चेंडूत ३४ धावा, सहा चौकार, एक षटकार) याच्या साथीने भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ७४ धावा जोडल्या. हा भारताचा श्रीलंकेविरुद्धचा टी-२० मधील पॉवरप्लेची सर्वोच्च धावसंख्या आहे. सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गिल दिलशान मदुशंकाचा बळी ठरला. गिल गेल्यानंतर यशस्वीही फार काळ टिकला नाही. सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याला वानिंदू हसरंगाने यष्टिचित केले. यशस्वी आणि गिलच्या शानदार फलंदाजीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांनी दमदार फटकेबाजी केली. हेही वाचा - Sanjay Manjrekar : ‘…हा विचार आपण सोडून देण्याची वेळ आलीय’; संजय मांजरेकरांचे टीम इंडियाच्या कोचबद्दल मोठे वक्तव्य सूर्याने २६ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या. पंतने ३३ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकारासह ४९ धावा केल्या. ज्यामुळे भारतीय संघाला ७ गडी गमावून २१३ धावांचा डोंगर उभारता आला. प्रत्युत्तरात एकवेळ श्रीलंकेची धावसंख्या एका विकेटवर १४० धावा होती. मात्र, यानंतर श्रीलंकेच्या संघाने ३० धावांत पुढील नऊ विकेट गमावल्या. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याने २० व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली.